संवेदनशील मुद्द्यांवर विनोद निर्माण करून ‘या’ कलाकारांनी ओढवून घेतला मोठा वाद

जगभरात सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची जोरदार चर्चा रंगली आहे. दोन्ही देशांतील संघर्ष पाहून सगळेजण चिंता व्यक्त करत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच अशा संवेदनशील विषयावर विवादास्पद मत मांडणे अभिनेता अर्शद वारसीला (Arshad Warsi) चांगलेच महागात पडले आहे. नेटकऱ्यांनी त्याला खडेबोल सुनावत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या आधीही अनेक कलाकारांनी अशा प्रकारे आपले मत व्यक्त करून वाद निर्माण केला होता. ज्यामुळे त्यांना जोरदार टीकेचा सामना करावा लागला होता. कोण आहेत असे कलाकार चला जाणून घेऊ.

कंगना रणौत (Kangana Ranout)
कंगना आणि वाद हे प्रकरण काही नवीन नाही. कंगना तिच्या विवादास्पद बोलण्याने नेहमीच रोष ओढवून येत असते. मात्र तिला शेतकरी आंदोलनावर टीका करणे चांगलेच महागात पडले होते. यावेळी तिने या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला महिंदर कौर यांच्याबद्दल बोलताना “हे लोक १०० रुपये दिले की कुठेही जाऊ शकतात” असे वक्तव्य केले होते. त्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. त्याचबरोबर तिच्यावर मानहानीची तक्रारही दाखल करण्यात आली होती.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

श्वेता तिवारी (Shweta Tiwari)
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सोशल मीडिया नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने एका कार्यक्रमात बोलताना चुकीचे विधान केले होते. ज्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. यामध्ये तिने एका वेब सिरीजसाठी प्रमोशन करताना “माझ्या ब्राची साईज देव मोजतात” असे धक्कादायक विधान केले होते. यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही तिच्यावर लावला होता. शेवटी तिला यावर माफी मागावी लागली होती.

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

कमाल रशीद खान (Kamal Rashid Khan)
आपल्या विवादास्पद बोलण्याने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्यांमध्ये कमाल खानचे नावही घेतले जाते. कमाल खानने सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाची खिल्ली उडवणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यावरून जोरदार वाद रंगला होता. सलमान खानने सुद्धा मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर कोर्टाने कमाल खानला सक्त ताकीद दिली होती.

View this post on Instagram

A post shared by KRK (@kamaalrkhan)

विवेक ओबरॉय (Vivek Oberoi)
अभिनेता विवेक ओबरॉयसुद्धा आपल्या एका वक्तव्याने वादात सापडला होता. २०१९ मध्ये त्याने आपली एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह फोटो शेअर केला होता. यामध्ये त्याने निवडणूकीच्या निकालावर बोलताना सलमान खानला ओपिनियन पोल, स्वतःला एक्झिट पोल आणि अभिषेक बच्चनला रिजल्ट दाखवत फोटो शेअर केला होता. ज्यामुळे त्याला माफी मागावी लागली होती.

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

राघव जुयाल (Raghav Juyal)
प्रसिद्ध डान्सर आणि ‘डान्स दिवाने ४’ कार्यक्रमाचा होस्ट राघवने कार्यक्रमात एका मुलीला चायनीज म्हणून हाक मारली होती. यावरून त्याला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. शेवटी राघवने या मुद्द्यावर माफी मागितली होती.

View this post on Instagram

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Latest Post