टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये नेहमीच एक संपला की एक असे रियॅलिटी शो सुरूच असतात. या रियॅलिटी शोमध्ये वेगवेगळ्या स्पर्धकांना सामील केले जाते. इंडस्ट्रीमध्ये राहूनही कलाकार सर्वांनाच ओळखता असे नाही. अनेक कलाकार शोच्या निमित्तानेच पहिल्यांदा भेटतात. रियॅलिटी शो हे कमीत कमी ३/४ महिन्यांचे असतात. त्यामुळे शोच्या निमित्ताने हे कलाकार एवढे दिवस सोबत राहतात. आणि त्यांच्यात चांगली मैत्री होते. काहींची मैत्री शो संपल्यानंतर संपुष्टात येते तर काहींची मैत्री शो नंतरही टिकून असते. रियॅलिटी शो दरम्यान झालेली मैत्री शो नंतरही टिकवणाऱ्या काही कलाकारांची नवे आज आपण या लेखातून जाणून घेऊया.
प्रिंस नरूला – किश्वर मर्चंट :
बिग बॉस – ९ दरम्यान या दोघांनीही मैत्री झाली त्यांची ही मैत्री शो नंतरही टिकून आहे. एवढेच काय बिग बॉस ९ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रिंसने त्याची ट्रॉफी किश्वरला दिली होती. यावरूनच त्यांच्यात असणारी घट्ट मैत्री समजून येते.
शमिता शेट्टी – नेहा भसीन :
नुकताच बिग बॉस ओटीटीचा शेवट झाला. या शोमध्ये शमिता आणि नेहा यांची मैत्री झाली. सुरुवातीला अनोळखी असणाऱ्या या दोघी शो दरम्यान हळूहळू चांगल्या मैत्रिणी झाल्या. आता शो संपल्यानंतरही त्या एकमेकींची स्तुती करताना, सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट टाकताना दिसत आहे.
सिद्धार्थ शुक्ला – शेहनाज गिल :
नुकतेच सिद्धार्थचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. बिग बॉस १३ च्या निमित्ताने सिद्धार्थ आणि शेहनाज यांच्यात भेट आणि नंतर मैत्री झाली. यांची मैत्री शो नंतरही टिकून होती. शो संपल्यावर हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट टाकायचे , रियॅलिटी शोमध्ये सोबत हजेरी लावत होते, म्युझिक व्हिडिओ मध्ये सोबत दिसले. या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील खूप रंगल्या. सिद्धरथच्या निधनाचा शेहनाजला मोठा धक्का बसला आहे.
वरूण सूद – विशाल आदित्य सिंग :
खतरो के खिलाडी ११ च्या निमित्ताने या दोघांची मैत्री झाली या दोघांच्या ब्रोमांसचे अनेक क्षण आपल्याला शोदरम्यान पाहायला मिळाले. एकमेकांसाठी त्यांनी स्टंट देखील केले. शो ची शूटिंग संपल्यानंतरही त्यांच्यातली मैत्री कायम आहे.
हिना खान – प्रियांका शर्मा :
बिग बॉस ११ च्या दरम्यान या दोघांची घरात भेट झाली, आणि पुढे मैत्री देखील झाली. आज बिग बॉस नंतरही यांच्यातली मैत्री टिकून आहे. अनेकदा हे दोघं हे सोबत स्पॉट केले जातात.
मिलिंद गाबा – अक्षरा सिंग :
बिग बॉस ओटीटीच्या निमित्ताने यांची भेट झाली. ही भेट आता मैत्रीत रूपांतरित झाली आहे. शोदरम्यान त्यांची मैत्री अनेकदा बघायला मिळाली. एका बातमीनुसार लवकरच हे दोघं त्यांच्या बिग बॉसच्या प्रवासावर एक गाणे देखील प्रदर्शित करणार आहे.
अली गोनी – राहुल वैद्य :
बिग बॉस १४ च्या दरम्यान यांची मैत्री झाली. घरात यांच्या ब्रोमांसच्या खूप चर्चा देखील व्हायच्या. शोमध्ये त्यांना ‘जय-वीरू’ हे नाव देखील देण्यात आले होते. शोनंतरही त्यांची मैत्री टिकून आहे. राहुलच्या लग्नातही अली दिसला होता.
या कलाकारांची मैत्री पाहून अनेकांना हेवा वाटतो.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध
-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज