Saturday, July 6, 2024

घटस्फोटानंतर पुरुषांपेक्षा जास्त त्रास महिलांना होतो, म्हणत ‘या’ कलाकारांनी व्यक्त केले दुःख

आजच्या काळात घटस्फोट घेणे खूपच सोपा पर्याय झाला आहे, असे अनेकांना वाटत असते. खासकरून बॉलिवूडमध्ये तर घटस्फोट घेणे खूपच सामान्य बाब असल्याचेही अनेकदा आपल्याला ऐकायला मिळते. मनोरंजनविश्वात नाती खूपच सहज तुटतात असा देखील खूप लोकांचा समज असतो. मात्र जेव्हा दोन व्यक्ती मोठा काळ एकत्र व्यतीत करतात, त्यानंतर घटस्फोटाचा निर्णय घेणे खूपच अवघड असते. इथे सर्वांचीच मानसिकता साऱखील होते. अर्थात या पायरीवर कलाकार आणि सामान्य लोकं सारख्याच ठिकाणी उभे असतात. आपण कलाकारांच्या घरस्फोटाच्या बातम्या ऐकतो आणि हसून त्यावर काहीतरी चुकीची कमेंट करून सोडून देतो. मात्र या घटस्फोटाचा त्रास सर्वांना सारखाच होतो. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या नावाजलेल्या कलाकारांचे घटस्फोट झाले आहे, काही घटस्फोट तर सर्वांसाठीच मोठा धक्का देखील होता. आजच्या आधुनिक काळातही घटस्फोट झालेल्या महिलांना समजत वेगळ्या नजरेने पाहिले जाते आणि वागवले देखील जाते. घटस्फोट झालेल्या महिला आणि पुरुषांमध्ये सर्वात जास्त महिलांनाच त्रास सहन करावा लागतो. घटस्फोट झालेल्या काही अभिनेत्रींने त्यांचा घटस्फोटाचा आणि त्यानंतरचा अनुभव व्यक्त केला आहे.

अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या घटस्फोटावर एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “एका मुलाच्या जन्मानंतर आणि लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर घटस्फोटाचा निर्णय माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूपच मोठा होता. मात्र या कठीण काळात माझे कुटुंब माझ्यासोबत धीराने उभे राहिले. घटस्फोटानंतर समाज महिलांकडे वेगळ्याच नजरेने बघतो. त्या फक्त लोकांच्या टोमण्यांचा, हसण्याचा आणि मजाकचाच विषय बनतात. या घटस्फोटानंतर पुरुषांच्याच तुलनेत महिलांना यातून बाहेर पडणे जास्त कठीण आहे. या बाबतीत आपल्या समाजात खूप मोठी असमानता आहे.”

आमिर खानने देखील लग्नाच्या १६ वर्षानंतर त्याचे पाहिले लग्न मोडले. त्याने त्याची पहिली पत्नी असलेल्या रीना दत्ताला डिवोर्स दिला. आमिर खानने घटस्फोट दिल्यानंतर एका मुलाखतीमध्ये मान्य केले की, तो काळ त्याच्यासाठी सर्वात वाईट होता. घटस्फोटानंतर आमिर मानसिक धक्क्यात होता. ज्या व्यक्तीसोबत त्याने एवढे वर्ष घालवले त्याच व्यक्तीपासून वेगळे होणे सोपी गोष्ट नव्हती. या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी आमिरला जवळपास दोन वर्षाचा मोठा कालावधी लागला.

ऋतिक रोशन आणि सुजैन खानने देखील अनेक वर्षांचा संसार मोडीत काढत घटस्फोट घेतला. हा निर्णय या दोघांसाठी देखील सोपा नव्हता. दोन मुलांच्या नंतर घटस्फोटापर्यंत पोहचणे अवघड होते. घटस्फोटानंतर आजही हे दोघं त्यांच्या मुलांसाठी एकत्र आहेत. ते मुलांसोबत बऱ्याचदा सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. त्यांचा घटस्फोटाचा कोणताही परिणाम मुलांवर होऊ दिला नाही.

वेबसिरीज आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध चेहरा असणाऱ्या कीर्ती कुल्हारीने देखील काही महिन्यांपूर्वी वेगळे होत असल्याचे जाहीर केले. तिने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटाचे दुःख व्यक्त करताना सांगितले होते की, ते वेगळे नक्कीच झाले आहे, मात्र त्यांनी कोणत्याही घटस्फोटाच्या पेपर्सवर साह्य केल्या नाहीये. याचा अर्थ अजूनही ते कायदेशीररित्या पती पत्नी आहे. कीर्ती पुढे म्हणाली की, घटस्फोटाचा निर्णय तिच्यासाठी खूप मोठा आणि दुःख देणारा होता. अशा गोष्टींदमेह केवळ तुम्ही नाही तर तुमच्यावर प्रेम करणारे सर्वच दुखी होतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कुठलंही धर्मांतर नाही, आम्ही दोघे जन्माने हिंदूच! मात्र, समीरची आई…’, क्रांती रेडेकरच्या ट्वीटने मोठा खुलासा

-आर्यन खान प्रकरण: समीर वानखेडेंनी मागितले ८ कोटी रुपये? साक्षीदाराचा मोठा आरोप

-वानखेडेंवर लावले जातायेत खंडणीचे आरोप, अभिनेत्री क्रांती रेडकरने पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मांडली पतीची बाजू

हे देखील वाचा