×

बॉलिवूडमधील ‘या’ कपलच्या घटस्फोटामुळे फॅन्सला बसला होता मोठा धक्का

मनोरंजनविश्वात नेहमीच नवीन नाते बनतात आणि बिघडतात देखील. मात्र बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांनी अनेक वर्ष सुखाने संसार केल्यानंतर मधेच त्यांचे नाते संपवत घटस्फोट घेतला. नुकताच सोहेल खान आणि सीमा खान यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या या खुलाशामुळे त्यांच्या फॅन्सला मोठा धक्का बसला असून, आता त्यांच्या वेगळे होण्याचे कारण काय असावे यावर अनेक मुद्दे समोर येत आहेत. मात्र बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी लग्नाच्या अनेक वर्षांनी घटस्फोट घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. आज आपण अशाच काही जोड्या पाहूया ज्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ माजली.

अरबाज खान आणि मलायका अरोरा :
बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडी म्हणून यांची जोडी ओळखली जायची. एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान त्यांची भेट झाली आणि त्यानंतर ते प्रेमात पडले. पुढे १९९८ साली त्यांनी लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. लग्नाच्या तब्ब्ल १९ वर्षानंतर त्यांनी २०१७ साली घटस्फोट घेतला.

ऋतिक रोशन आणि सुजेन खान :
ग्रीक गॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि बॉलिवूडचा सर्वात हँडसम अभिनेता असणाऱ्या ऋतिक रोशन इंटिरियर डिझायनर असणाऱ्या सुजेन खानशी २००० साली लग्न केले, मात्र लग्नाच्या १४ वर्षांनी अर्थात २०१४ साली त्यांनी घटस्फोट घेतला.

आमिर खान आणि किरण राव :
आमिर खानने पाहिले लग्न रीना दत्तासोबत केले. त्यांना दोन मुलं झाली. मात्र लग्नाच्या १५ वर्षांनी त्याने रिनाला घटस्फोट दिला. पुढे आमिर खानने २००८ साली किरण रावसोबत लग्न केले त्यांना एक मुलगा झाला. मात्र लग्नाच्या १५ वर्षांनी त्या दोघांनी देखील घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले.

aamir khan and kiran rao

सामंथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य :
२०२१ मधील सर्वात जास्त चर्चेत असणारा घटस्फोट म्हणजे सामंथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य यांचा. शूटिंग दरम्यान त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेम झाले २०१७ साली त्यांनी भव्य सोहळ्यात लग्न केले. मात्र लग्नाच्या ५ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला.

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत :
रजनीकांतची मुलगी असलेल्या ऐश्वर्याने अभिनेता धनुषसोबत लगीनगाठ बांधली. त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. दोघानी २००४ साली लग्न केले त्या दोघांना दोन मुलं असून, त्यांच्या या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता.

Dhanush And Aishwarya Rajinikanth

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post