×

‘अयोद्ध्येत यायचंय ना? मग आधी माफी मागा’, भोजपूरी गाण्यातून राज ठाकरे यांना थेट इशारा, पाहा गाण्याचा Video

सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आगामी अयोद्ध्या दौऱ्याची (Ayodhya Visit) जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेचे प्रमुख प्रमुख कारण ठरत आहे, ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांचा राज ठाकरेंच्या दौऱ्याला होत असलेला विरोध. एकीकडे या संपूर्ण प्रकरणामुळे वातावरण तापलेलं असतानाच एका भोजपूरी गाण्याचा (Bhojpuri Song) व्हिडिओ (Video) जोरदार व्हायरल होतोय.

भोजपूरी भाषेतील या गाण्यातून राज ठाकरे यांना त्यांच्या आगामी अयोद्ध्या दौऱ्यावरुन इशारा देण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रारंभीच्या राजकीय कारकिर्दीत उत्तर भारतीयांच्या विरोधात घेतलेली भुमिका आणि अनेकदा उत्तर भारतीयांना मनसे कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण, यामुळे खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोद्ध्येत येण्यापूर्वी माफी मागण्याची मागणी केली आहे. याच मागणीला पकडून एक भोजपूरी गीत बनवण्यात आले आहे.

काय म्हटलंय या भोजपूरी गीतात?

‘माफी मांगो राज ठाकरे’ असे या भोजपूरी गीताचे बोल आहेत. (Bhojpuri Song Mafi Mango Raj Thackeray) राज ठाकरे यांना अयोद्ध्येत पाऊल ठेऊन देणार नाही, अशी भुमिका नेताजी म्हणजेच खासदार ब्रृजभूषण यांनी घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे अयोद्ध्येत यायचंय तर अगोदर माफी मागा, असे या गीतात म्हटले आहे.

“कदम नहीं रखने देंगे, ये नेताजींने ठाना है, माफी मांगो राज ठाकरे अगर अयोध्या आना है” असे या गाण्याचे बोल असून महेश निर्मोही नामक गायकाने हे गाणे गायले आहे. तर, योगेश दास शास्त्री याने ते लिहिले आहे. बब्बन आणि विष्णू यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

(Warning To MNS Leader Raj Thackeray From Bhojpuri Song Mafi Mango Over Ayodhya Visit)

अधिक वाचा

‘डोला रे डोला’ गाण्याच्या शुटिंगवेळी ऐश्वर्या रायच्या कानातून वाहू लागले रक्त, तरीही पूर्ण केली शूटिंग

शाहिर साबळेंच्या भूमिकेसाठी अंकुश चौधरी कशाला म्हणणाऱ्यांना निर्माते केदार शिंदेनी दिले सणसणीत उत्तर

…अन् बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली देण्यासाठी सलमान खानने स्टेजवर केलं ‘असं’ काही

Latest Post