मनोरंजन विश्वातील सिनेसृष्टी प्रत्येकालाच मोठी स्वप्ने दाखवते. अशात अनेकांची स्वप्ने पूर्ण होतात. ते यशाचं शिखर गाठतात, पण या मनोरंजनाच्या या भूल भुलभूलैयामध्ये मिळालेली प्रसिद्धी काही काळच टिकते. प्रसिद्धी संपली की श्रीमंत कलाकारांच्या पदरी देखील दारिद्र्य येते. अशात बॉलीवूडमध्ये देखील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली, प्रसिध्दी आणि पैसे दोन्ही कमवले परंतु कालांतराने त्यांनी ते सर्व गमावले. शेवटच्या क्षणी त्यांना पाणी पाजायलाही कोणी नव्हते. या बातमीमधून अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत.
परवीन बाबी
परवीन बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांच्या सुंदरतेवर अनेक लोक त्यावेळी फिदा होते. बॉलिवूडमध्ये त्यांची स्वतः ची एक वेगळी छाप पाडली होती. रुपेरी पडद्यावर त्यांना पाहून लोक क्षणासाठी स्वतःचे वय विसरुन जात होते. त्या प्रथम भारतीय अभिनेत्री होत्या, ज्यांचा फोटो ‘टाइम्स मॅक्झिन’मध्ये पहिल्या पानावर छापण्यात आला होता. एवढ्या सुंदर अभिनेत्री असून देखील त्या कायमच खऱ्या प्रेमाच्या भुकेल्या होत्या. ज्यामुळे काही काळानंतर त्यांना मानसिक आजार झाला. त्यामुळे त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा कुणालाच काही माहीत नव्हते. त्यांचे शव त्यांच्या घरामध्ये पडून होते. मृत्यू नंतर तीन दिवसांनी त्या या जगात नाहीत हे समजले.
ए.के. हंगल
‘इतना सन्नाटा क्यू है भाई’ या डायलॉगमुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःचे घर करणारे अभिनेता ए.के. हंगल यांनी त्या काळी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ते कामासाठी खूप तटस्थ स्वभावाचे होते. एकदा उशिरा आल्यामुळे त्यांनी राज कपूर यांना चांगलेच फटकारले होते. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी २२५ चित्रपटांमध्ये काम केले. अशात काही काळानंतर त्यांना आर्थिक चणचण भासू लागली होती. पुरेसे पैसे नसल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकला नाही आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अंत्यविधीवेळी देखील जास्त माणसे नव्हती आली.
मीना कुमारी
आपल्या सुंदर आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी, यांनी त्यांच्या काळात या सिनेसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार देखील त्यांच्या सौंदर्यामुळे भाळले होते. परंतु त्यांनी कमाल अमरोही यांच्याशी विवाह केला. त्यांच्या आयुष्यात आनंद फार काळ टिकला नाही. वयक्तिक आयुष्यातील मतभेदांमुळे त्या दारुच्या आहारी गेल्या होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
भारत भूषण
आपल्या अभिनयाने भारत भूषण यांनी बॉलिवूडमध्ये यशाचे शिखर गाठले होते. त्यांनी ‘बैजू बावरा’ या चित्रपटामध्ये मीना कुमारी यांच्यासह दमदार अभिनय केला होता. ते रुपेरी पडद्यावर जशा दुखःद भूमिका साकारत होते, अशीच दुःखं त्यांच्या आयुष्यात देखील होती. लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर बाळाला जन्म देताना त्यांची पत्नी देवा घरी गेली. त्यानंतर त्यांचे चित्रपटांमधील काम देखील डगमगू लागले. शेवटच्या वेळी त्यांनी स्वतः चे घर आणि गाडी विकली होती. अशा पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला.
विमी
बीआर चोप्रा यांच्या ‘हमराज’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विमी यांनी देखील त्यांच्या कारकीर्दीमध्ये बॉलिवूड चांगलेच गाजवले होते. परंतु चित्रपटांमधील त्यांची पकड फार काळ टिकली नाही. त्यांच्या वाईट प्रसंगी त्यांच्या पतीने त्यांना साथ दिली, पण ते देखील विमी यांना सोडून गेले. नैराश्यामुळे त्या दारूच्या आहारी देखील गेल्या होत्या. अशात त्यांना अनेक आजार जडले होते. त्यामुळे त्यांचे मुंबईच्या नानावटी रुग्णालयात निधन झाले.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक
ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…