Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड सावळ्या असूनही ‘या’ अभिनेत्रींनी लावला बॉलिवूडमध्ये सुंदरतेचा आणि हॉटनेसचा तडका

सावळ्या असूनही ‘या’ अभिनेत्रींनी लावला बॉलिवूडमध्ये सुंदरतेचा आणि हॉटनेसचा तडका

सिनेसृष्टी म्हटले की, इथे सुंदरता, उत्तम फिटनेस, आकर्षक चेहरा हे विषय पहिले येतात. मग छोटा पडदा असो अथवा मोठा पडदा. ता क्षेत्रात सुंदर अभिनेत्रींना प्रथम प्राधान्य दिले जाते. विशेषतः सावळा रंग असल्यास त्यांना डावलले जाते. आधीच्या काळात अशा पद्धतीचे भेदभाव खूप व्हायचे. मात्र सध्या काळ बदलला आणि सुंदरतेइतकेच प्रतिभेला देखील महत्व दिले जातो. आज बॉलिवूडमध्ये अनेक सावळ्या रंगाच्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या कलेने यशाचे शिखर गाठले आहे. या बातमीमधून आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेऊ.

प्रियांका चोप्रा

प्रियांका सावळ्या रंगाची आहे. मात्र रंगामुळे तिच्या कामात कधीच अडथळा निर्माण झाला नाही. तिने मुख्य अभिनेत्रीपासून ते खलनायिकेपर्यंत अनेक भूमिका उत्तम साकारल्या. विशेष म्हणजे साल २००० मध्ये तिने विश्वसुंदरीचा किताब जिंकला. तिने बॉलिवूडसह हॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये देखील दमदार अभिनय केला आहे.

बिपाशा बासू

बिपाशासाठी तिचा सावळा रंगचं तिची खरी ओळख आहे. तिच्या अभिनयाने तिने अनेक चाहते कमावलेत. ‘अलोन’, ‘राझ’, ‘धूम २’, ‘राझ ३’, अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने दमदार कामगिरी केली आहे. अभिनेत्री तिच्या हॉट आणि हटके लूकमुळे देखील नेहमी चर्चेत असते. ही बंगाली ब्युटी नेहमीच तिच्या सौंदर्याची जादू प्रेक्षकांवर पसरवत असते.

मलायका अरोरा

मलायकाही एक उत्तम अभिनेत्री आणि दमदार नृत्यांगना देखील आहे. छैय्या छैय्या, गुर नालो इश्क मीठा, माही वे, काल धमाल, आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यांसाठी ती विशेष ओळखली जाते. ‘वेलकम’, ‘डॉली की डोली’, ‘हाउसफुल टू’, ‘प्रेम का गेम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने अभिनयाने समीक्षकांची मने जिंकली आहेत. मलायका देखील सावळ्या रंगाची आहे.

शिल्पा शेट्टी

शिल्पा देखील सावळ्या रंगाची आहे. मात्र नियमित व्यायाम आणि योगामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेजी असते. तिने आता पर्यंत ‘बाजीगर’, ‘आग’, ‘हातकडी’, ‘कर्ज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदीसह तिने तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. शिल्पा एक उत्तम उद्योजिका देखील आहे.

राधिका आपटे

राधिका आपटे ही एक मराठमोळी अभिनेत्री असून तिने बॉलिवूड देखील चांगलेच गाजवले आहे. रंगाने तशी तीही सावळीच आहे. मात्र अभिनयात तिने चांगलीच कामगिरी केली. अभिनयासह राधिका तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
‘वाह..! लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटांमधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. साल २००९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘घो मला असला हवा’मधून तिने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली आहेत.

सुष्मिता सेन

सुष्मिता रंगाने सावळी आहे मात्र तिच्या रंगामुळे तिच्या मार्गात कधीच आडथळा निर्माण झाला नाही. कारण तिने कायमच जिद्दीने आणि मेहनतीने स्वतःचे काम केले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी फेमिना मिस इंडियाची ती मानकरी झाली होती. तिने ‘दस्तक’, ‘फिझा’, ‘नायक’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

दीपिका पदुकोण
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिकाने यशाचे मोठे शिखर गाठले आहे. तिची त्वचा देखील सावळी आहे. मात्र दीपिकाने तिच्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनयाने ती सध्याची भरगोस मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…

बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास

अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, “राज्य सरकारचा ‘हा’ नियम थिएटर व्यावसायाच्या मुळावर घाव घालणारा”

हे देखील वाचा