×

टीव्हीवर सतत लागूनही प्रेक्षकांना ‘हे’ सिनेमे पाहायला कधीही येत नाही कंटाळा

चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर काही कालावधीनंतर ते टीव्हीवर येतात. एकदा सिनेमे टीव्हीवर आले की, हळूहळू ते सिनेमे टीव्हीवर लागण्याच्या संधी वाढायला लागतात. सुरुवातीला वर्ष सहा महिन्यातून एकदा टीव्हीवर लागणारे सिनेमे हळूहळू महिन्यावर आणि मग आठवड्यांवर येऊन टीव्हीवर लागायला लागतात. काही सिनेमे तर त्या त्या चॅनेलवर आठवड्यातून दोनदा देखील दाखवले जातात. काही चित्रपटांमुळे प्रेक्षक कंटाळता देखील मात्र काही चित्रपट टीव्हीवर कितीही वेळेस लागले तरी प्रेक्षक ण कंटाळता आणि न थकता ते सिनेमे पाहतात. आज या लेखातून आपण असेच मोजके सिनेमे जाणून घेऊया जे टीव्हीवर कधीही आणि कितीही वेळा लागले तरी प्रेक्षक आवर्जून ते बघतात.

कभी ख़ुशी कभी गम :
करण जोहर दिग्दर्शित या सिनेमात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, ऋतिक रोशन, करीना कपूर अशा तगड्या कास्टला घेऊन हा सिनेमा तयार झाला. या सिनेमात एका कुटुंबाची कहाणी दाखवली होती. भावनिक कथा आणि करीना कपूरचा ग्लॅमरस अंदाज सर्वांनाच खूपच आवडला. तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा जोडण्याची गोष्ट या सिनेमातून पाहायला मिळते.

जब वी मेट :
शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचा हा अतिशय सुंदर सिनेमा आजही सर्वांना पाहायला आवडतो. प्रचंड बोलणारी गीत आणि शांत आदित्य यांची अनोखी प्रेम कहाणी या सिनेमातून साकारण्यात आली आहे. या सिनेमातील गाणी, संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहे.

नायक :
अनिल कपूरचा हा राजकारणावर आधारित असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षक आवडीने बघतात. शिवाजी रावच्या भूमिकेत असणारा अनिल कपूर खूप भाव खाऊन गेला. न्यूज चॅनेलमध्ये कॅमेरामन असणारा अनिल एका मुलाखतीमुळे थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जाऊन बसतो.

हेरा फेरी :
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल सिनेमा देखील या यादीत समाविष्ट आहे. कॉमेडीने परिपूर्ण असलेला हा सिनेमा बघताना अजिबात कंटाळा येत नाही. आजही या सिनेमाची लोकांमध्ये तुफान क्रेझ आहे. सिनेमातील परेश रावळची बाबू भाई ही भूमिका आजही लोकप्रिय आहे.

हेही वाचा –

Latest Post