Monday, March 4, 2024

हाेणाऱ्या जावायासाेबत बाेनी कपूर यांनी दिली पाेज? एकदा ‘ताे’ व्हिडिओ पाहाच

चित्रपट निर्माते बोनी कपूर लेक जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत दिसले. दोघेही मुंबईत  एनएमएसीसीच्या कार्यक्रमाला पोहोचले होते. जान्हवी कपूरने एनएमएसीसी कार्यक्रमात पॅपारझींसमाेर पोज दिली नसली तरी तिचा रुमर्ड बाॅयफ्रेंड शिखर पहाडियाने अभिनेत्रीचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत पाेज दिली.

मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 31 मार्च)ला पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता. मात्र, यावेळी जान्हवी कपूर (janhvi kapoor) हिने मीडियासाठी पोज दिली नाही, पण तिचे वडील बोनी कपूर (boney kapoor) हे लेक जान्हवीचा रुमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत दिसले. एका पापाराझी अकाऊंटने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बोनी कपूर शिखर पहाडियासाेबत कार्यक्रमात येताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये बोनी कपूरने फॉर्मल आउटफिट परिधान केलेला दिसत आहे, तर शिखर पहाडियाने हिरवे जॅकेट आणि पांढरा शर्ट परिधान केला आहे. जान्हवी कपूरने इंस्टाग्रामवर कार्यक्रमाशी संबंधित अनेक फोटो शेअर केले आहेत. शिखर पहाडियाने यापूर्वी जान्हवी कपूरला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक सुंदर पाेस्ट शेअर कली हाेती. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी अद्याप त्यांचे नाते सार्वजनिक केलेले नाही. मात्र, दोघेही अनेक प्रसंगी एकत्र दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

विशेष म्हणजे शेखर पहाडिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. याआधी दोघांचे ब्रेकअप झाले होते. मात्र, आता दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत. ( boney kapoor poses with actress janhvi kapoor rumored boyfriend shikhar pahadia at nmacc launch video goes viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मास्टरशेफ इंडिया’ शोला मिळाला अंतिम विजेता ‘या’ स्पर्धकाने ट्रॉफीवर नाव कोरत मिळवले २५ लाखांचे बक्षीस

रामलीला सिनेमाच्या सेटवरचे ‘ते’ चित्र पाहत शरद केळकर म्हणाला होता ‘भन्साळी किती पैसे वाया घालवतात यात मी…’

हे देखील वाचा