Friday, April 18, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज कलाकारांना आधीच मिळाले होते मृत्यूचे संकेत; सलमान खानच्या सहकलाकाराचाही समावेश

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज कलाकारांना आधीच मिळाले होते मृत्यूचे संकेत; सलमान खानच्या सहकलाकाराचाही समावेश

माणसाने त्याच्या बुद्धीच्या जोरावर अनेक उत्तमोत्तम शोध लावले. अगदी मंगळावर देखील त्याने यान पाठवले. मात्र, येणाऱ्या काळाबद्दल, किंवा भविष्याबद्दल नेहमीच आशेवर जगत आला आहे. जोतिष्य विद्येच्या जोरावर माणूस भविष्याचा अंदाज नक्कीच बंधू शकतो. मात्र, खात्री देऊन तो भविष्याबद्दलचे कोणतेच विधान करत नाही.

एक मात्र नक्की कधी- कधी कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ असते. कधी- कधी अपवाद घडतात, तर कधी- कधी आपल्या अंतरात्म्याचा आवाज आपल्याला येणाऱ्या काळाबद्दल संकेत देऊन जातो. हे नेहमीच घडते असे नाही, पण काही लोकांच्या बाबत नक्कीच घडते. मृत्यू किंवा वाईट घटनांबद्दल अनेकदा असे घडत असते.

मनोरंजसृष्टीकडे पाहिले, तर असे अनेक कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या येणाऱ्या मृत्यूबद्दल आधीच संकेत मिळाले होते. आज आपण या लेखातून अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

इरफान खान
हिंदी सोबतच हॉलिवूड सिनेसृष्टी गाजवणारा आणि अभिनय जिवंत करण्यासाठी ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून इरफान खान ओळखले जातात. इरफान यांनी त्याच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटातील ‘हिरो’ची व्याख्याच बदलून टाकली. याच इरफान यांनी गेल्यावर्षी या जगाचा निरोप घेतला. इरफान यांच्या शेवटच्या काळाबद्दल त्यांचा मुलगा बाबिलने सांगितले होते. बाबील म्हणाला होता की, “त्यांच्या मृत्यूच्या तीन दिवस आधी मी हॉस्पिटलमध्ये होतो. त्यांची शुद्ध हरपत चालली होती. त्यातच त्यांना जग अली, त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि हसून म्हणाले, मी आता मारणार आहे. त्यावर मी म्हणालो, असे काही होणार नाही. त्यावर त्यांनी लगेच डोळे मिटले.”

किशोर कुमार
ज्यांच्या आवाजाने हिंदी सिनेमातील गाण्यांना संजीवनीसोबतच एक नवीन ओळख दिली, असे आवाजाचे जादूगार किशोर कुमार हे देखील या यादीत सामील आहे. किशोर कुमार यांनी त्यांच्या आवाजाने सर्वच श्रोत्यांना वेड लावले होते. वेगवेगळे आवाज गाण्यात काढून ते प्रत्येक गाण्याला एका उंचीवर नेऊन ठेवत. किशोर कुमार यांना देखील त्यांच्या मृत्यूबद्दल काही तरी जाणवत असावे. किशोर कुमार यांच्या मुलाने अमित कुमार यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी त्यांनी माझ्या लहान भावाला सुमितला स्विमिंगला जाऊ दिले नाही. मी कॅनडाला होतो, आणि त्याच दिवशी भारतात यायला निघालो होतो. त्यांना माझे विमान वेळेत येईल की नाही? यांची खूप चिंता होत होती. सोबतच त्यांना हार्टअटॅकचे काही लक्षणं देखील जाणवत होते. मात्र, त्यांनी डॉक्टरांना बोलू दिले नाही. पुढच्या काही वेळातच ते हृदयविकाराच्या धक्क्याने गेले.”

मोहम्मद रफी
आपल्या आवाजाने ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करणारे मोहम्मद रफी यांना सुद्धा त्यांच्या मृत्यूची जाणीव झाली असावी. ३० जुलै, १९८० रोजी रफी साहब एका चित्रपटाचे ‘शाम क्यो उदास हैं’ चे रेकॉर्डिंग करून निघत होते, तेव्हा त्यांनी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना विचारले की, “शुड आय लिव्ह.” त्याचे हे वाक्य ऐकून लक्ष्मीकांत हैराण झाले. कारण रफी साहेब कधीच असे विचारत नव्हते.

तरुणी सचदेव
‘रसना गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी क्यूट मुलगी आजही सर्वांना आठवत असणारच. तरुणीने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला. एवढ्याशा वयातच तरुणीने तिची एक ओळख तयार केली होती. विमान दुर्घटनेमध्ये तरुणीचा मृत्यू झाला होता. तरुणी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रवास करत असताना विमान कोसळले. निघताना तिने तिच्या मैत्रिणींना मिठी मारून ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. तरुणी प्रवासापूर्वी असे कधीच करत नव्हती.

इंदर कुमार
अभिनेता इंदर कुमार अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘वाँटेड’ सिनेमात सलमानच्या भावाची, मित्राची त्याची भूमिका खूप गाजली. इंदरचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘शांती’ अशी पोस्ट शेयर केली होती. त्यानंतर थोड्याच दिवसात त्याचा मृत्यू झाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा