प्रेमात आकंठ बुडलेल्या ‘या’ कलाकारांनी कोणाचीही पर्वा न करता केले दुसरे लग्न, काहींनी तर धर्म बदलत केले दुसरे लग्न


लग्न झाले म्हणजे व्यक्तीला पुन्हा प्रेम होईलच असे नाहीये. अनेकदा लग्न झाले असूनही काही जणं पुन्हा प्रेमात पडतात. यासाठी अनेक कलाकार पहिले लग्न मोडून दुसरे लग्न करायला देखील मागेपुढे बघत नाही. सिनेसृष्टीमधे दुसरे लग्न ही अप्रूप वाटणारी गोष्ट नाहीये. आजच्या काळात घटस्फोट आणि पुन्हा लग्न ही खूपच सामान्य बाब झाली आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अगदी २२ वर्षांचा संसार देखील संपुष्टात आणला. तर काहींनी दुसरे लग्न तर केले मात्र पहिल्या पत्नीला घटस्फोट देखील दिला नाही. काही कलाकारांनी दुसरे लग्न करता यावे यासाठी धर्म देखील बदलला. या लेखातून आपण अशाच काही कलाकारांची नावे बघणार आहोत, ज्यांनी दोनदा, तीनदा सुद्धा लग्न केले आहेत.

धर्मेंद्र :
बॉलिवूडचे हीमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी देखील दोन लग्न केले. धर्मेंद्र यांनी अनेक दशकं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. त्यांना पडद्यावर पाहून अनेक तरुणी घायाळ झाल्या होत्या. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. त्यांना सनी आणि बॉबी ही मुले देखील झाले. मात्र पुढे जाऊन चित्रपटांमध्ये काम करत असताना धर्मेंद्र ड्रिमगर्ल असणाऱ्या हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. त्यांनी हेमा यांच्याशी लग्न करण्याचे ठरवले. ही गोष्ट त्यांच्या पत्नीला बिलकुल आवडली नाही. तरीही त्यांनी लग्न करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मुस्लिम धर्म स्विकारला आणि लग्न केले. त्यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट न देता हे लग्न केले.

सलीम खान :
जुन्या काळातील लोकप्रिय पटकथाकार म्हणून ओळखले जाणाऱ्या सलीम खान यांनी देखील दोन लग्न केले. सलीम खान यांनी पहिले लग्न सलमा खान यांच्यासोबत केले. या लग्नातून त्यांना सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान ही तीन मुले झाली. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न लोकप्रिय डान्सर हेलन यांच्याशी केले. या लग्नाला सलमा यांची कोणतीही नाराजी नव्हती. सलमा यांनी आनंदाने या लग्नाला संमती दिली होती. पुढे सलीम खान आणि हेलन यांनी अर्पिताला दत्तक घेतले. हे सर्व अतिशय गुण्यागोविंदाने राहतात.

संजय खान :
८० च्या दशकातील सुपरहिट अभिनेते संजय खान यांनी देखील दोन लग्न केले होते. संजय यांनी जरीन कटरक यांच्याशी पहिले लग्न केले. या लग्नानंतर जवळपास १० वर्षांनी त्यांचे नाव बोल्ड आणि ब्युटीफुल अशी ओळख असणाऱ्या झीनत अमान यांच्यासोबत जोडले गेले. काही दिवसांनी झीनत आणि संजय यांनी लग्न केल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर असे समजले की संजय यांनी जरीन यांना घटस्फोट न देताच झीनत यांच्याशी लग्न केले. मात्र हे लग्न जास्त काळ टिकले नाही केवळ दोनच वर्षात ते वेगळे झाले.

महेश भट्ट :
लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांनी सुद्धा दोन लग्न केली. त्यांचे पहिले लग्न किरण यांच्यासोबत झाले आणि त्यांना मुलगी पूजा भट्ट झाली. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न अभिनेत्री सोनी राजदान यांच्यासोबत मुस्लिम धर्म स्वीकारत केले. त्यांना आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट या दोन मुली झाल्या. महेश भट्ट यांनी लग्न तर दोनच केले मात्र त्यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले.

राज बब्बर :
राज बब्बर यांनी देखील दोन लग्न केली. त्यांचे पहिले लग्न या इंडस्ट्रीत येण्याआधी अभिनेत्री नादिरा यांच्यासोबत झाले. या क्षेत्रात आल्यानंतर ते सुंदर स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले. त्यांना स्मिता यांच्याशी लग्न करायचे होते, मात्र नादिरा यांनी त्यांना घटस्फोट द्यायला नकार दिला. तरीही स्मिता यांच्या प्रेमात वेडे झालेल्या राज यांनी कसलीही पर्वा न करता स्मिता यांच्याशी लग्न केले. मात्र दुर्दैवाने त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या काही वर्षांनीच स्मिता यांनी या जगाचा निरोप घेतला. प्रतीक बब्बर यांच्या जन्मांनंतर स्मिता यांचे निधन झाले.


Leave A Reply

Your email address will not be published.