टीव्ही इंडस्ट्रीमधील असे प्रेमीयुगूल, ज्यात एका जोडीदाराने दुसऱ्याला दिला धोका अन् ओढवलं ब्रेकअपचं संकट


प्रेम म्हणजे दोन लोकांमध्ये असलेले एक निर्मळ नाते. जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष अनेक काळ कामाच्या निमित्ताने किंवा इतर कोणत्याही कारणाने जेव्हा सोबत घालवतात, तेव्हा बऱ्याच वेळा ते दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि प्रेमात पडतात. पण प्रेमात पडणे खूप सोपे असले तरी प्रेम टिकवणे प्रचंड अवघड आहे. आपल्या सिनेसृष्टीमधे अशा अनेक जोड्या आहेत, ज्या सोबत काम करत असताना प्रेमात पडल्या मात्र पुढच्या काही काळातच त्या वेगळ्या देखील झाल्या. म्हणूनच प्रेम म्हणजे हे एक गोड विष आहे, ही म्हण खोटी नाहीये. आज आपण टीव्ही इंडस्ट्रीमधील अशाच काही जोड्यांची नावे बघणार आहोत ज्या सोबत काम करताना प्रेमात तर पडल्या मात्र त्यांना त्याचे प्रेम निभावता आले नाही, म्हणून काही काळातच ते वेगळे झाले.

अविनाश सचदेव:
झी टीव्हीच्या ‘छोटी बहू’ या मालिकेच्या दरम्यान अविनाश आणि रुबिना या दोघांची भेट झाली. भेटीनंतर काही काळातच या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि हे रील लाईफ असणारे कपल रियल लाईफमध्ये देखील कपल झाले. मात्र पुढच्या काही दिवसातच अविनाश दुसऱ्या अभिनेत्रींनसोबतही रुबीनाला दिसू लागला, मग रुबिनाने त्याच्यासोबत असलेले नाते संपवले. आज रुबिनाने अभिनव शुक्लासोबत लग्न केले आहे तर अविनाशने पलक परसवानी सोबत लग्न केले आहे.

एजाज खान:
एजाज खान देखील त्याच्या काव्यांजलि मालिकेतील सहकलाकार अनीता हसनंदानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र त्याने दुसऱ्या एका अभिनेत्रींसाठी अनिताला सोडले. त्यानंतर इजाजने एका कार्यक्रमादरम्यान कबूल केले होते की, त्याने अनिताला सोडून चूक केली आहे.

प्रियांक शर्मा:
प्रियांक अनेक वर्ष दिव्या अग्रवालसोबत नात्यात होता. पण जेव्हा त्याने बिग बॉसमध्ये प्रवेश केला तेव्हा तो बेनाफ्शा सूनावालासोबत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या, आणि दिव्याने प्रियांक सोबत असलेलं नाते संपवले.

करण पटेल:
टीव्ही इंडस्ट्रीतील हँडसम अभिनेता करण पटेल आणि अभिनेत्री काम्या पंजाबी अनेक वर्ष एकत्र होते. मात्र काम्याने करणसोबत ब्रेकअप करत त्याने तिला धोका दिल्याचे सांगितले होते.

शरद मल्होत्रा:
दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा अनेक वर्ष सोबत होते, मात्र जेव्हा दिव्यांकाला शरद तिला धोका देत असल्याचे समजले तेव्हा तिने त्याचे नाते संपवले. दिव्यांका आणि शरद त्यांच्या ‘बनू मैं ‘तेरी दुल्हन’ मालिकेच्या सेटवर भेटले होते. हे दोघे तब्बल ८ वर्ष सोबत होते.

नीष नागदेव:
टीव्ही अभिनेत्री मुस्कान अरोडाने मनीष नागदेवसोबत त्यांचे नाते मनीषने धोका दिल्यामुळे संपवले, शिवाय तिने मनीष विरोधात मानसिक त्रास दिल्याची तक्रार देखील दाखल केली होती.

अंकित गेरा:
अंकित गेरा आणि अदा खान अनेक वर्ष नात्यात होते, मात्र काही काळाने अंकितला त्याच्या मालिकेतील त्याची सहकलाकार रूपल त्यागी आवडायला लागली हे समजल्यावर अदाने त्यांचे नाते संपवले.

मेल्विन लुइस:
प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि डांस इंडिया डांसचा स्पर्धक मेल्विन लुईसने अभिनेत्री सना खानला सोडले होते. त्याला जेव्हा समजले की सना त्याला धोका डेट आहे, तेव्हा त्याने ब्रेकअप केले.


Leave A Reply

Your email address will not be published.