Monday, June 17, 2024

बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या नावावर आहे, सर्वाधिक हॉलीवूडपटांमध्ये काम करण्याच्या रेकॉर्ड

सध्या आपण पाहिले तर अनेक बॉलिवूड कलाकार किंबहुना अनेक भारतीय कलाकार हॉलिवूडमध्ये काम करताना दिसतात. अगदी दिवंगत अभिनेते इरफान खानपासून आलिया भट्ट, सामंथा रुथ प्रभु, प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणपर्यंत अनेक कलाकार हॉलिवूडमध्ये काम करताना आपण पाहिले. सर्वात जास्त हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम कोणी केले असे जर विचारले तर अनेक जणं इरफान खान असे उत्तर देखील मात्र ते खरे नाही. सर्वाधिक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याचा रेकॉर्ड एका वेगळ्याच अभिनेत्याच्या नावावर आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रभावी अभिनेते असलेल्या सईद जाफरी यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहित असेल. सईद यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या. त्यांच्या अनेक भूमिका अजरामर भूमिका म्हणून देखील ओळखल्या जातात. याच सईद जाफरी यांनी हिंदीसोबतच हॉलिवूडमध्ये देखील काम केले. त्यांनी तब्बल गांधी, मसाला, ए पैसेज टू इंडिया, माई ब्यूटीफुल लॉन्ड्रेट आदी १८ आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९७७ साली त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात केली. त्यांनी तब्बल १०० हिंदी आणि एका पंजाबी चित्रपटात काम केले. १९९८ साली त्यांनी भारतीय सिनेमाला रामराम म्हटले आणि ते आंतरराष्ट्रीय आणि ब्रिटिश टीव्हीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

सईद यांनी अनेक ब्रिटिश टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्यांना त्यांच्या करियरमध्ये अनेक उत्तम भूमिका साकारल्या ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले आहेत. १५ नोव्हेंबर २०१५ रोजी लंडनमध्ये त्यांच्या घरी ब्रेन हॅमरिंगमुळे त्यांचे निधन झाले. २०१६ साली त्यांना मनरोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अधिक वाचा-
शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा