Monday, June 24, 2024

ऐकावे ते नवलच! जागतिक कीर्तीचा ‘हा’ अभिनेता वयाच्या ८३ व्या वर्षी चौथ्यांदा होणार बाबा

हॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते अल पचीनो हे वयाच्या ८३ व्या वर्षी चौथ्यांदा बाबा होणार आहेत. अल पचीनो यांच्या मॅनेजरने सांगितले की. अल पचिनो यांची गर्लफ्रेंड असणारी नूर अल्फल्लाह ही आठ महिन्यांची प्रेग्नेंट असून, त्यांच्या बाळाच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे.

दरम्यान अल पचिनो आणि त्यांची गर्लफ्रेंड नूर यांना एकदा डिनर डेटसाठी एकत्र पाहिले गेले आणि नंतरच त्यांच्यात काहीतरी असल्याच्या आणि रिलेशनशिपच्या बातम्यांना ऊत आला होता. नूर केवळ २९ वर्षांची असून अल हे ८३ वर्षांचे आहेत. त्यांच्यात तब्बल ५४ वर्षांचे अंतर आहे. या बाळासोबतचे ते आता चौथ्यांदा वडील होणार आहेत. याआधी त्यांना त्यांची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या एक्टिंग कोच जान टैरंट यांच्यापासून ३३ वर्षाची जुली मेरी ही मुलगी आहे. तर ते अजून त्यांची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या बेवर्ली डी’एंजेलो आणि त्यांच्या एंटोन आणि ओलिविया या 22 वर्षीय जुळ्या मुलांचे देखील वडील आहेत.

दरम्यान अल पचिनो यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी अनेक आयकॉनिक चित्रपटांमध्ये कमालीच्या सुंदर भूमिका केल्या आहेत. त्यांना त्यांच्या या चित्रपटांमुळे जागतिक ओळख मिळाली. त्यांनी क्लासिक ‘द गॉडफ़ादर’ या सिरीजसोबतच ‘स्कारफेस’, ‘सेंट ऑफ़ ए वुमन’, ‘हीट’, ‘सर्पिको’, ‘सी ऑफ़ लव’, ‘द डेविल्स एडवोकेट’, ‘द इनसाइडर’, … ‘एंड जस्टिस फ़ॉर ऑल’, ‘कार्लिटोज़ वे’, ‘डॉनी ब्रास्को’, ‘ओशन्स थर्टीन’, आणि अजून अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहेत.

अल पचिनो यांना नुकतेच ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलीवुड’, ‘द आयरिशमैन’, ‘हाउस ऑफ गुच्ची’, ‘द पाइरेट्स ऑफ सोमालिया’,’ डैनी कॉलिन्स’ आदी अनेक चित्रपटांमध्ये प्रभावी अभिनय करताना पाहिले गेले. दरम्यान त्यांच्या या चौथ्यांदा बाबा होण्याच्या बातमीमुळे ते संपूर्ण जगात कमालीचे गाजत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘रामायण’ फेम ‘सीता’चे 33 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेत मिळाली दमदार व्यक्तिरेखा

पहचान कौन! बाॅलिवूडच्या ‘या’ सुपर हॉट अभिनेत्रीने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा