Saturday, June 15, 2024

‘रामायण’ फेम ‘सीता’चे 33 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेत मिळाली दमदार व्यक्तिरेखा

छोट्या पडद्यावर 80च्या दशकात ‘रामायण’ ही मालिका प्रचंड गाजली होती. कोरोनाच्या काळात ही मालिका टीव्हीवर पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आली होती. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक आजही तितकंच प्रेम करतात. ‘रामायण’मधून अभिनयाची झलक दाखवून अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी घराघरात प्रसिद्धी मिळवली. या मालिकेत त्यांनी सीताची भूमिका साकारली आहे. तिला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

दीपिका (Dipika Chikhlia) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या फोटो व रील्स शेअर (Deepika Chikhlia Photos and Videos) करीत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या काही रील्सवरून नेटकरी त्यांना ट्रोलही करतात. वयाच्या २२ व्या वर्षी दिपिका यांनी रामायण मालिकेत काम केलं आहे. या मालिकेतनंतर त्यांच्या करिअरला एक वेगळच वळण मिळाल होतं. विशेष म्हणजे या वयातही त्या खूपच ग्लॅमरस दिसतात. त्यांचा सोशल मीडियावर चांगलाच वावर असल्याच पहायला मिळत.

दीपिका 33वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. दीपिका या 1990मध्ये संजय खानच्या ‘द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान’ या मालिकेत छोट्या पडद्यावर दिसल्या होत्या. दीपिका यांनी मंगळवारपासून त्यांच्या नवीन मालिकेच्या शूटिंग सुरूवात केले आहे. या मालिकेची त्या स्वत: निर्मिती करत असून त्या अभिनय करताना दिसणार आहे. ‘धरतीपुत्र नंदिनी’ या मालिकेचे शूटिंग मंगळवारपासून मुंबईत सुरू झाले आहे.

दीपिका म्हणाल्या की, “स्वतः निर्माती होण्यामागे अनेक कारणे आहेत. एक अभिनेत्री म्हणून मला कशाचीच मजा येत नव्हती, मला ज्या प्रकारच्या भूमिका करायच्या होत्या त्या करता येत नव्हत्या. त्यामुळेच काही चांगलं काम करता यावं म्हणून मी स्वत:चं प्रोडक्शन सुरू करण्याचा विचार केला.”

प्रॉडक्शन आणि अभिनय या दोन्ही मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, त्या तुम्ही कशा सांभाळता? असे विचारल्यावर दीपिका म्हणल्या की, “मला असे वाटत होते की, मला निर्मिती म्हणून काम करण्याची जबाबदारी पेलणार नाही. पण काही लोकांशी पुन्हा चर्चा केली. तेव्हा अभिनय आणि निर्मिती या दोन्ही मोठ्या जबाबदारीची कामे कशी चालतात हे मी समजून घेतले आणि कामाला सुरूवात केली. आमची टीम इतकी चांगली तयार झाली आहे की, आता या दोन्ही गोष्टी सोप्या वाटतात.”

‘धरतीपुत्र नंदिनी’ ही मालिका एक फॅमिली ड्रामा शो आहे, ज्यामध्ये कौटुंबिक मुद्यावर काही गोष्टी दाखवल्या जाणार आहे. दीपिका यांनी २०१८ मध्ये ‘गालिब’ या चित्रपटात काम केल होत. या चित्रपटात त्यांनी दहशतवादी अफजल गुरुच्या आईची व्यक्तीरेखा साकारली होती. (‘Ramayana’ fame actress dipika chikhlia will be making a comeback on the small screen after 33 years)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
निळू फुले यांची लेक अभिनेत्री गार्गी फुलेंची राजकारणात एन्ट्री, वडिलांच्या विचारधारेशी साधर्म्य असलेल्या ‘या’ पक्षात प्रवेश
वादांसोबत जुने नाते असलेल्या कॉमेडियन, अभिनेता असलेल्या वीरदासच्या एकूण संपत्तीबद्दल घ्या जाणून

 

हे देखील वाचा