Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड चौदा वर्षे टिकले होते ‘या’ अभिनेत्रीचे क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीनशी लग्न, सलमान खानसोबतही जोडले होते नाव

चौदा वर्षे टिकले होते ‘या’ अभिनेत्रीचे क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीनशी लग्न, सलमान खानसोबतही जोडले होते नाव

चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री अशा होत्या, ज्यांनी चित्रपटात आपले नाव तर कमावलेच, परंतु त्यांच्या नावाची चर्चा ही खासगी आयुष्यामुळे फार झाली. अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्या प्रेमप्रकरणांमुळे त्या आजही चर्चेचा विषय आहेत. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे संगीता बिजलानी. संगीता यांच्या कारकिर्दीवर टाकलेली एक नजर…

संगीता बिजलानी ज्यांनी कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. यासोबतच त्यांनी मिस इंडियाचा किताबही पटकावला होता. यानंतर त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या प्रवासाला सुरुवात झाली. संगीता बिजलानी या ८०-९० च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांची फिल्मी कारकीर्द फारशी नव्हती, परंतु त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असायचे.

संगीता यांचे सर्वात गाजलेले प्रेमप्रकरण सलमान खानसोबत होते. दोघांच्या लग्नाची पत्रिकाही छापली गेली होती, पण नंतर ते दोघे वेगळे झाले, आणि लग्न तुटले. काही वर्षांनंतर पुन्हा एकदा संगीता यांचे प्रेमप्रकरण बाहेर आले. त्यांचे नाव माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनसोबत जोडले गेले.

अजहर यांची भेट संगीता यांच्याशी एका जाहिरातीच्या शूटिंगवेळी झाली होती. अजहर यांच्या म्हणण्यानुसार, ही पहिली भेट त्यांच्यासाठी खूपच रंजक होती, आणि संगीता यांना पहिल्यांदाच पाहून ते त्यांच्या प्रेमात पडले. यानंतर या दोघांचे संवाद वाढले. अजहरचे यापूर्वीच नौरीनशी लग्न झाले होते, आणि दोन मुलांचे वडील होते. १९९६मध्ये त्यांनी नौरिन यांना घटस्फोट दिला, आणि संगीता यांच्याशी लग्न केले. अजहर आणि संगीता या दोघांच्या नात्यात १४ वर्षांनंतर कटूता निर्माण झाली. सन २०१० मध्ये ते वेगळे झाले.

माध्यमांतील वृत्तानुसार, अजहर हे संगीता आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांच्या वाढत्या जवळीकीमुळे नाराज होते. ज्यामुळे संगीता यांनी अजहर यांना घटस्फोट दिला. अजहर यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर संगीता यांनी पुन्हा कधीच कोणाशी लग्न केले नाही. संगीता या आता ६० वर्षांच्या आहेत. संगीता आणि अजहर यांना सुनील नावाचा मुलगाही आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून अमिताभ बच्चन यांनी डावा हात खिशात टाकून केली होती ‘शराबी’ चित्रपटाची शूटिंग

-‘मिस युनिव्हर्स’ ते ‘मिसेस भूपती’ बनण्यापर्यंत ‘असा’ होता लारा दत्ताचा प्रवास, जाणून घ्या अभिनेत्रीबद्दलच्या रंजक गोष्टी

-सोपा नव्हता मनोज वाजपेयी यांचा चित्रपट प्रवास, वडिलांना शेतात करायचे मदत, बिग बींचा ‘हा’ चित्रपट पाहून धरली अभिनयाची वाट

हे देखील वाचा