मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्रींनी आजवर त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने छोटा पडदा तुफान गाजवला आहे. या अभिनेत्री एका पाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांसमोर येतच असतात. मात्र अशातच काही अभिनेत्री या वेगवेगळ्या प्रसंगांमुळे अभिनयापासून दूर झाल्या. यातील अनेक अभिनेत्रींनी आधी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र, जेव्हा याच अभिनेत्रींनी ब्रेकनंतर पुन्हा अभिनयात पदार्पण केले, तेव्हा त्यांना त्यांची जादू प्रेक्षकांवर पसरवता आली नाही. या अभिनेत्रींना त्यांची पकड हवी तशी धरता आली नाही. त्यामुळे अनेक निर्मात्यांना देखील याचा आर्थिक फटका बसला. यातीलच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेऊ.
दीपिका कक्कर
साल २०१० मध्ये ‘नीर भरे तेरे नैना देवी’ या मालिकेमधून दीपिकाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ‘बिग बॉस १२’ ची ती विजेती आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर ती ‘ससुराल सिमर का २’ मध्ये झळकली. मात्र तिची ही मालिका फार काही चालली नाही.
एरिका फर्नांडिस
एरिकाने तिच्या अभिनयामध्ये काही काळ गॅप घेतला होता. मोठ्या विश्रांतीनंतर ती एकता कपूरच्या ‘कसोटी जिंदगी की २’ मध्ये झळकली. त्यानंतर सध्या ती ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी २’ मध्ये अभिनय करत आहे. परंतु आता रसिक प्रेक्षकांना तिचा अभिनय काही खास वाटत नाही.
जूही परमार
साल १९९८ मध्ये जूहीने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने काही चित्रपट आणि अनेक मालिकांमध्ये अभिनय केला. ‘बिग बॉस ५’ ची ती विजेता झाली. त्यानंतर सर्वांना असे वाटले की आता जूही अधिक दमदार अभिनय साकारणार पण तसे झाले नाही. पुढे तिच्या ‘संतोषी मां’ आणि ‘हमारी वाली गुड न्यूज’ या दोन्ही मालिका फ्लॉप झाल्या.
परिधि शर्मा
‘जोधा अकबर’ या मालिकेमध्ये जोधा बाई हे पात्र साकारणारी परिधि सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरत आहे. ‘चीकू की मम्मी दूर की’ या मालिकेमध्ये ती सध्या नुपूर हे पात्र साकारत आहे. परंतु ही मालिका आणि त्यातील अभिनेत्रीचा अभिनय प्रेक्षकांना आवडलेला नाही.
राजश्री ठाकूर
साल २००५ मध्ये ‘साथ फेरे’ या मालिकेमधून राजश्री घराघरात पोहोचली. साल २०१५ मध्ये ती ‘भारत का वीर पुत्र’ मध्ये झळकली. त्यानंतर तिने ५ वर्षे ब्रेक घेतला. साल २०२० मध्ये पुनरागमन करत ती ‘शादी मुबारक’ मध्ये झळकली. मात्र तिची ही मालिका फ्लॉप ठरली.

श्वेता गुलाटी
‘इश्क की घंटी’ या मालिकेमध्ये श्वेताने दमदार अभिनय केला होता. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. साल २००९ मध्ये ‘डिटेक्टीव नानी’ या शोमध्ये देखील ती झळकली. परंतु सध्या तिचा शो कोणालाच आवडत नाही.
सुकृती कंडपाल
अभिनेत्री मोठ्या ब्रेक नंतर ‘स्टोरी ९ मंथ की’ मध्ये दिसली होती. मात्र प्रेक्षकांना तिची ही मालिका आवडली नाही. त्यामुळे निर्मात्यांना खूप लवकरच ही मालिका बंद करावी लागली.
अंकिता लोखंडे
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेनंतर आता अंकिता ‘पवित्र रिश्ता २’ मध्ये अभिनय करत आहे. ही मलिका ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली आहे. परंतु या मालिकेला चाहत्यांची हवी तशी पसंती मिळत नाहीये. अनेकांचे असे म्हणणे आहे की, मालिका ओटीटीवर प्रदर्शित झाल्यामुळे आणि या मध्ये सुशांत सिंग राजपूत नसल्यामुळे ही मालिका हवी तशी चालत नाही.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…
–बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास










