Saturday, June 29, 2024

हौसेला मोल नाही आणि फॅशनला तोड नाही! घटस्फोट झाल्यानंतर चक्क ‘या’ अभिनेत्रीने केले डिवोर्स फोटोशूट

आजच्या जगात कधी कोणती गोष्ट फॅशन होईल आणि काय गाजेल हे खुद्द ब्रह्म देव देखील सांगू शकणार नाही. फोटो आपल्या आयुष्यातील काही अनमोल क्षणांना कायम फोटोच्या रूपात कैद करून आपल्याला ठेवता येते. पूर्वी फोटो म्हटले की फक्त लग्न हेच आठवायचे मात्र आजच्या काळात लग्नाआधीचे प्री वेडिंग फोटो, गरोदरपणातले मॅटर्निटी फोटो, एंगेजमेंट फोटो, बारसे फोटो, असे एक ना अनेक फोटोशूटचे पर्याय समोर आले आहेत. अनेकांना हे आवडते काहींना नाही आवडत. मात्र असे शूट सध्या सर्रास केले जातात. मात्र काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका हटके फोटोशूटची तुफान चर्चा रंगलेली दिसत आहे. आणि ते फोटो गाजत देखील आहे, आणि ते शूट म्हणजे डिवोर्स फोटोशूट.

डोक्याला हात नका मारून घेऊन, पण हो एका अभिनेत्रीने चक्क तिचे डिवोर्स फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटचे अनेक फोटो आणि तिची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तामिळ अभिनेत्री असलेल्या शालिनीने तिच्या नवऱ्यापासून रियाजपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर शालिनीने तिचे डिवोर्स फोटोशूट केले आणि त्यातील काही निवडक फोटो सोशल मीडियावर पोस्ट देखील केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by shalini (@shalu2626)

या फोटोशूटमध्ये तिचे फोटो पाहिजे तर तिच्या हातात डिवोर्स लिहिलेला बॅनर दिसत आहे. एका फोटोमध्ये ती तिच्या लग्नाचा फोटो फडताना दिसत आहे, तर एका फोटोमध्ये तिच्या नवर्यासोबतच्या फोटोची फ्रेम पायाखाली चिरडताना दिसत आहे. यासोबतच तिने हातात अनेक हटके ओळी लिहिलेले फलक देखील पकडले आहेत. यातील एकावर लिहिले आहे की, “मला ९९ समस्या मिळाल्या मात्र एक नवरा नाही मिळाला.”

शालिनीने हे सर्व फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “एका घटस्फोटित महिलेचा संदेश त्या सर्व लोकांना जे स्वतःला आवाज नाही असे समजतात. एका वाईट लग्नाला तोडणे योग्य आहे, कारण तुम्हाला आनंदी राहण्याचा अधिकार आहे आणि कधीच तडजोड करू नका. जीवनावर नियंत्रण ठेव आणि बदल करा. हे तुमच्यास्तही आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी गरजेचे आहे.”

पुढे शालिनीने लिहिले आहे, “घटस्फोट हे एक अपयश नाही. हे तुमच्यास्तही आणि तुमच्या आयुष्यासाठी सकारात्मकता आणणारे वळण आहे. लग्न मोडून पुन्हा उभे राहण्यासाठी खूप मोठ्या हिंमतीची गरज असते. त्यासाठी हे मी माझ्या सर्व हिमतवान महिलांना समर्पित करते.”

दरम्यान शालिनीने टीव्ही मालिका ‘मुल्लुम मलारुम’ नंतर मोठ्या प्रमाणावर स्वतःची ओळख निर्माण केली. शालिनीला या लग्नातून रिया नावाची एक मुलगी देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

विकिपीडिया मावशींची ‘ही’ चूक ठरली जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासाठी डोकेदुखी

“सलमानसाठी सर्वात सुरक्षित जागा…” सलमान खानच्या सुरक्षेवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

हे देखील वाचा