Wednesday, February 21, 2024

वडिलांच्या निधनानंतर भावनिकरित्या तुटलेल्या ‘या’ अभिनेत्रीला राहुल गांधी यांनी दिला होता आधार, स्वतः केला खुलासा

कन्नड अभिनेत्री आणि माजी राजकारणी राम्या यांनी एका शोमध्ये एक हैराण करणारा खुलासा केला आहे. वीकएंड विद रमेश सिझन 5 शोची पहिली पाहुणी म्हणून राम्या यांनी हजेरी लावली होती. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आरटी नारायण यांच्या निधनानंतर अतिशय मोठ्या ट्रॉमामधून गेल्या. या काळात त्यांच्या मनात अनेकदा आत्महत्येचे देखील विचार आले होते.

राम्या यांनी त्यांच्या या मुलाखतीमध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतरच्या कठीण काळाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, या काळात त्यांना राहुल गांधी यांनी भावनिकरीत्या खूप पाठिंबा दिला. त्या पुढे म्हणाल्या, “माझ्या वडिलांना गमवल्यानंतर दोन आठवडयांनी मी संसदेमध्ये होती. मी कोणालाच ओळखत नव्हती. मला काहीच माहित नव्हते. मला संसदेच्या कामकाजाबद्दल देखील काही माहित नव्हते. मात्र मी सर्व शिकले. माझ्या दुःखाला माझ्या कामात येऊ दिले नाही. मांड्या येथील लोकांमुळे मला हा आत्मविश्वास मिळाला होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Kannada (@zeekannada)

दरम्यान राम्या यांनी त्यांच्या अभिनयाच्या करियरमध्ये मोठ्या उंचीवर असतानाच राजकारणात प्रवेश केला. २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया अभिनयाचे नेतृत्व केले. मात्र या निवडणुकेचे परिणाम पक्षाच्या बाजूने नव्हते. त्यानंतर लगेच त्यांनी सोशल मीडिया विंग आणि राजकारण यांना रामराम ठोकला. त्यांना राहुल गांधी यांनी वडिलांच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी भावनात्मक खूप मदत केली.

त्या म्हणाल्या की, “माझ्या आयुष्यावर माझ्या आईचा त्या नंतर माझ्या वडिलांचा आणि मग राहुल गांधी यांचा मोठा प्रभाव आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर माझ्या मनात अनेकदा आत्महत्येचे विचार आले. मात्र राहुल गांधी यांनी मला खूप मदत केली.”

दरम्यान राम्या यांना दिव्या स्पंदना या नावाने ओळखले जाते. त्या लवकरच ‘उत्तराखंडा’ या सिनेमातून चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सैफच्या आधी अमृता पडली हाेती ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात; प्रकरण लग्नापर्यंतही पाेहाेचले हाेते, पण…

‘त्या एका कॉलने माझं लाईफ…’ अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेली “ती” पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा