Sunday, December 8, 2024
Home साऊथ सिनेमा धक्कायदायक! ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीचा विनयभंग, फोनवर पाठवले जाताय अश्लील मेसेज आणि फोटो

धक्कायदायक! ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीचा विनयभंग, फोनवर पाठवले जाताय अश्लील मेसेज आणि फोटो

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील ऐश्वर्या भास्करन यांची एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख आहे. त्या मुख्यतः मल्याळम, तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम करतात. मात्र मागील काही वर्षांपासून त्यांना काम मिळत नाही. त्यामुळे त्यांनी २०२२ साली साबणं विकण्याचे काम चालू केले. सोबतच त्यांनी त्यांचे एक यूट्यूब चॅनेल देखील सुरु केले आहे. या चॅनेलचे नाव मल्टी मॉमी आहे. या चॅनेलच्या माध्यमातून त्या विविध रेसिपी आणि साबणाच्या व्यवसायाशी संबंधित व्हिडिओ त्या अपलोड करत असतात. मात्र आता त्यांनी सांगितले आहे की, मागील काही दिवसांपासून त्यांचा विनयभंग केला जात आहे.

ऐश्वर्या यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की मागील काही काळापासून त्यांचा विनयभंग केला जात आहे. त्या म्हणाल्या की, त्यांनी त्यांचा फोन नंबर सोशल मीडियावर टाकला होता जेणेकरून ग्राहक त्यांच्याकडे साबणाच्या ऑर्डर देतील, मात्र एक दिसावं अचानक रात्री त्यांना अश्लील संदेश आणि फोटो येण्यास सुरुवात झाली.

ऐश्वर्या यांनी पुढे सांगितले की, एका व्यक्तीने त्याच्या गुप्तांगांचे फोटो त्यांना पाठवले आहेत. तर काहींनी विचारले की साबणांना वैयक्तिक स्वरूपात बघता येतील का? असे मेसेज पाहून त्या घाबरल्या. आता त्यांनी त्यांच्या मुलीच्या सल्ल्यानुसार यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनपर्यंत त्यांनी सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार केली नसली तरी त्या म्हणाल्या त्यांना अजून त्रास झाला तर त्या नक्कीच पोलिसांची मदत घेतील.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘माझा संघर्ष घरात प्रसिद्ध चेहरे असल्यामुळे…’ ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिच्या कठीण काळाबद्दल

प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टवरून नेटकऱ्यांनी उडवली तिची खिल्ली विचारले, “हा कोणता खेळ आहे”

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा