Friday, July 5, 2024

बिग बॉस: केवळ पैशासाठी ‘ही’ अभिनेत्री पुन्हा जाणार बिग बॉस’च्या घरात?

राखी सावंत टेलिव्हिजन आणि हिंदी सिनेमातील चर्चित नाव. राखी लवकरच बिगबॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. राखीने तिच्या बिग बॉसच्या घरात जाण्याआधी तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित अनेक खुलासे केले आहेत. ती फक्त पैशासाठी पुन्हा बिग बॉस हाऊसमध्ये जात असल्याचे तिने सांगितले.

राखी नेहमी तिच्या विविध व्यक्तव्यांमुळे ओळखली जाते. ती नेहमी लग्न, बॉयफ्रेंड, राजकारण आदी अनेक कारणांसाठी चर्चेत असते. आता पुन्हा राखी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे बिग बॉस. हो लवकरच राखी विवादित अशा बिग बॉसच्या घरात एक चॅलेंजर म्हणून एकतरी घेणार आहे.

याआधी राखीने बिग बॉसच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर पुन्हा राखी या घरात जाण्यासात ठी सज्ज आहे. याघरात राखी शुक्रवारी एंट्री घेणार आहे. त्याआधी माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, ” मी ह्या घरात जाण्यासाठी खूपच उत्सुक आहे. मला सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या घरात राहून हा शो जिंकायचा होता. मी सहभाग घेतलेल्या पर्वात मला विजेता नाही होता आले, मात्र यावेळी मी हा शो जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. ह्या शो मध्ये पुन्हा यायला मी फक्त पैशासाठी होकार दिला. मागच्या काही काळात मी बँककरप्ट झाली आहे. माझ्याजवळील सर्व पैसा संपला असून मी काही दिवसांपूर्वी माझ्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी माझे दागिने देखील विकले होते. ज्या व्यक्तीने मला पैशाच्या बाबतीत धोका दिला ती व्यक्ती आता मरण पावली आहे. त्यामुळे मी आता या काहीच करू शकत नाही. बिग बॉस जिंकणाऱ्या विजेत्याला ५० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. माझ्यासाठी ही रक्कम खूप महत्वाची आहे. मला हे सुद्धा माहित आहे की हा कार्यक्रम जिंकणे एवढे सोपे नाहीये. पण मी प्रयत्न नक्कीच करणार.”

राखीने याअधिक राखी का स्वयंवर, नच बलिये, राखी का इन्साफ आदी अनेक रियालिटी शो केले. शिवाय ती मस्ती आणि मैं हू ना या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या रूपातही दिसली होती. राखीने अनेक चित्रपटात आयटम सॉंग्स केले आहेत.

हे देखील वाचा