सिनेसृष्टीतील कलाकार कधीकधी असे काही करून बसतात, ज्यामुळे त्यांना चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. भोजपुरी अभिनेत्री श्वेता महारा हिच्यासोबत असं घडलं आहे. श्वेता ही भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या गाण्यांनी तिने खेसारी लाल यादव, पवन सिंग यांसारख्या मोठ्या कलाकारांना टक्कर दिली आहे. तसेच, आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, आता तिने मिळवलेली प्रसिद्धीला कुठेतरी धक्का लागण्याचे काम तिच्याकडून घडले आहे. त्यामुळे तिला जोरदार ट्रोल केले जात आहे.
श्वेताकडून देसी लूक आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रचार
नुकतेच श्वेता महारा (Shweta Mahara) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती हातात दारूचा ग्लास पकडून सिगारेट ओढताना दिसत आहे. या फोटोत अभिनेत्री लाल चुडा, गळ्यात वजनदार नेकलेस, मोठे झुमके आणि मांगटिका परिधान करून पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. तिने फक्त एवढंच केले असते, तर चाहत्यांना तिच्याकडून कदाचित काही समस्या नसती. मात्र, कहर करत ती देसी लूकमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रचार करत आहे. नशा करणे आणि याचा सोशल मीडियावर प्रचार करणे भारतीय महिलेला शोभत नसल्याचे लोक म्हणत आहेत. अनेकांनी तिला जोरदार ट्रोल केले आहे. मात्र, काहींना तिचा हा लूक भलताच आवडला आहे.
धुम्रपान आणि दारूच्या ग्लासचा फोटो पाहून लोकांच्या धक्कादायक प्रतिक्रिया
श्वेता महारा हिने दारू आणि सिगारेट ओढतानाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “ये नजरे जरा झुका के चले जनाब.” यासोबतच तिने पुढे लिहिले की, “धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे.” तिच्या या फोटो हजारो लाईक्स मिळाले आहेत. याव्यतिरिक्त नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊसही पाडला आहे. काहींना तिचा हा फोटो आवडला नाहीये, तर काहीजण तिची प्रशंसा करत आहेत.
View this post on Instagram
एकाने कमेंट करत लिहिले की, “ओह माय गॉड.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “हा आतापर्यंतचा सर्वात भारी फोटो.”आ आणखी एकाने लिहिले की, “तू सिगारेटही ओढते, छी.” एका युजरने तिच्या फोटोवर कमेंट करत “हे चुकीचे आहे,” असे म्हटले.
अशाप्रकारे श्वेताच्या या पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्रीबद्दल बोलायचं झालं, तर ती भोजपुरी इंडस्ट्रीतील ट्रेंडिंग स्टार आहे. तिला अनेक म्युझिक व्हिडिओतून स्थानिक सिनेमाला गौरवले आहे. तिच्यावर चित्रीत झालेले अनेक गाणेही ब्लॉकबस्टर ठरले आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुष्काने पतीच्या आठवणीत लिहिली भावूक पोस्ट, विराटनेही दिला असा रिप्लाय की, सर्वत्र रंगली एकच चर्चा
‘आता वेळ आलीये…’, चंदिगड विद्यापीठातील व्हायरल एमएमएसवर सोनू सूदचा संताप
बॉलिवूडवर बहिष्काराच्या ट्रेंडमध्ये ‘हे’ हिंदी कलाकार साउथच्या सिनेमात करणार पदार्पण