Sunday, June 22, 2025
Home कॅलेंडर ‘नजर मिलाओ बबुआन से’, डान्सचा तडका असलेलं हे भोजपुरी गाणं होतंय तुफान व्हायरल; पाहा व्हिडिओ

‘नजर मिलाओ बबुआन से’, डान्सचा तडका असलेलं हे भोजपुरी गाणं होतंय तुफान व्हायरल; पाहा व्हिडिओ

आपल्या आवाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहच्या व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतात. भोजपुरी चित्रपटसृष्टीत पवन सिंह हे असं नाव आहे, ज्याचे चित्रपट आणि गाणी प्रदर्शित झाल्या झाल्या सुपरहिट ठरतात. यावरून आपल्याला कळालंच असेल की उत्तरप्रदेश बिहरमध्ये पवन सिंहची लोकप्रियता किती आहे. गेल्या काही दिवसांपासून पवन सिंहचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सप्टेंबरमध्ये पवनसिंग याचं भोजपुरी गाणं ‘नजर मिलाओ बबुआन से’ प्रदर्शित झालं. हे गाणे सप्टेंबरपासून सोशल मीडियावर आहे. या गाण्याचा व्हिडिओ पाहून लोक अक्षरशः दिवाणे झाले. या गाण्याला स्वत: पवनसिंग याने आपला आवाज दिला. तर पवनसिंग याच्यासमवेत सोना सिंग ने हे गाणं गायलं आहे.

पीआरए फिल्म्सने यूट्यूबवर अपलोड केलेल्या या गाण्याचा व्हिडिओ आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. याशिवाय, लोक या व्हिडिओवर शेकडोंमध्ये प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकताच पवन सिंगचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात पवन सिंह लंडनमध्ये भोजपुरी अभिनेत्री मधुसिंगसोबत एका गाण्याचे शूट करताना दिसत आहे. भोजपुरी सिनेमांमध्ये पॉवर स्टार म्हणून ओळखला पवन सिंह सध्या राजकारणात सक्रिय आहे. २०१४ साली पवन सिंहने भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला होता.

पवन सिंह ने २००७ मध्ये ‘रंगीली चुनरीया तोहरे नाम’ या चित्रपटामधून भोजपुरी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. यानंतर २००८ मध्ये त्याने भोजपुरीया दरोगा आणि प्रतिज्ञा या दोन चित्रपटांमध्ये काम केलं. प्रतिज्ञा चित्रपटामुळे पवन सिंहला विशेष प्रसिद्धी मिळाली.

लोक त्याला ओळखू लागले. मग पवन ने पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही. २००९ मध्ये त्याचे तब्बल सहा चित्रपट प्रदर्शित झाले. यानंतर दरवर्षी पवन ने चित्रपटांचा जणू सपाटाच लावला होता. दरवर्षी त्याचे सहा ते आठ सिनेमे प्रदर्शित होत राहिले. आणि पवन सिंह चा पॉवर स्टार पवन सिंह झाला.

हे देखील वाचा