बॉलिवूड इंडस्ट्री हे एक छोटे कुटुंबच आहे. आणि या कुटुंबाची दारं सदैव सर्वांसाठी खुली आहे. या क्षेत्रात ज्यांना येण्याची इच्छा आहे, ते सर्वच लोकं बिनदिक्कतपणे या क्षेत्रात येऊन त्यांच्यातील प्रतिभा लोकांसमोर मांडू शकतात. याला देशांच्या सीमा अडवू शकत नाही. बॉलिवूडमध्ये कोणीही कोणत्याही देशातून येऊ शकते, याला कुठेच काहीच बंधन नाही. आजच्या घडीला देखील या क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, जे परदेशातून बॉलिवूडमध्ये आले आहेत. अगदी हेलन यांच्यापासून सुरु झालेली ही यादी आजच्या नोरा फतेहीपर्यंत भरपूर मोठी आणि लांबलचक आहे. मात्र तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? आज इंडस्ट्रीमध्ये यशाच्या शिखरावर असणारे अनेक कलाकार हे मूळचे भारतीय नाहीच आहे. अनेक कलाकारांचा जन्म हा भारताबाहेर झाला असून, त्यांना दुसऱ्या देशाचे नागरिकत्व जन्मतः मिळाले आहे. यावरून अनेक या यादीतले अनेक कलाकार ट्रोल देखील झाले आहे. आज या लेखातून जाणून घेऊया अशाच काही कलाकारांची नावे.
दीपिका पदुकोण
बॉलिवूडच्या मस्तानीचा जन्म देखील भारतात झाला नाहीये. तिचे वडील प्रकाश पदुकोण त्या शहरात असल्याने तिची आई देखील डेन्मार्कमध्ये असल्याने तिचा जन्म डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन शहरात झाला. मात्र ती या शहरात जास्त दिवस राहिली नाही.
आलिया भट्ट
वाचून आश्चर्य वाटले ना? पण आलिया भट्ट देखील भारतीय नागरिक नाही. तीच जन्म लंडनमध्ये झाला असून तिच्याकडे आणि तिच्या आईकडे इंग्लंडच्या नागरिकत्वासोबतच पासपोर्ट देखील आहे.
सारा जेन डायस
प्रसिद्ध मॉडेल आणि २००७ साली मिस इंडिया झालेली सारा देखील मूळची ओमानची आहे.
हेलन
बॉलिवूडमध्ये दिसणाऱ्या हेलन या पहिल्याच विदेशी अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म बर्मामध्ये झाला. त्यांनी १९५८ साली ‘हावडा ब्रिज’ मध्ये ‘मेरा नाम चीन चीन चू’ गाण्यावर डान्स करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
इम्रान खान
‘जाने तू या जाने ना’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवणारा आणि आमिर खानचा भाचा असणाऱ्या इम्रान खानचा जन्म देखील भारताबाहेर अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधील मॅडिसन येथे झाला. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तो मुंबईत आला.
कॅटरिना कैफ
कॅटरिनाचे वडील काश्मिरी वंशाचे होते. तिचा जन्म ब्रिटिश हॉंगकॉंगमध्ये झाला होता. तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.
एमी जॅक्सन
ब्रिटिश मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या रम्य जॅक्सनने ‘एक दिवाना था’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र ती यश मिळवू शकली नाही. रम्य मूळची ब्रिटीश नागरिक आहे.
मोनिका डोग्रा
संगीतकार आणि अभिनेत्री असणारी मोनिका देखील भारतीय नसून तिचा जन्म अमेरिकेत झाला आहे. तिने धोबीघाट सिनेमातून पदार्पण केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ