Wednesday, July 3, 2024

नाव मोठं लक्षण खोटं! स्वत:च आपली प्रतिमा मलीन करणारे सेलिब्रिटी; एकाने मुलीला काम देण्याच्या बहाण्याने…

मुंबईतील बॉलिवूड म्हणजेच स्वप्नांची चंदेरी दुनिया, या चंदेरी दुनियेत आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेकजण मुंबईत येत असतात. कुणी दिग्दर्शक, कुणी संगीतकार, कुणी गायक, तर कुणी अभिनेता बनण्यासाठी बॉलिवूडच्या दिशेने पावलं टाकत असतात. मात्र, वरवर आकर्षक दिसणारे बॉलिवूड आतमधून किती भयानक आहे, हे तिथे गेल्यावरच कळतं. अनेकदा यातील प्रकरणं चव्हाट्यावरही आलेली पाहायला मिळतात. बॉलिवूडमधील अनेक कलाकारा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. यामध्ये संजय दत्तपासून ते ‘राम तेरी गंगा मैली’ फेम मंदाकिनीसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

आपण या लेखातून जाणून घेणार आहोत, अशाच काही कलाकारांबद्दल ज्यांना वादग्रस्त कामे करताना रंगेहात पकडण्यात आले होते. चला तर मग सुरुवात करूया… (This Bollywood Celebs Caught Red Handed)

संजय दत्त
प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तला ‘संजू बाबा’ म्हणूनही ओळखले जाते. संजय दत्त हा आपल्या अभिनयाव्यतिरिक्त इतर कारणांमुळेही चर्चेत राहत असतो. संजयला सन १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या घरातून एके ५६ रायफलसह इतर वस्तूही जप्त करण्यात आल्या होत्या. यामुळे संजयला चांगलाच त्रास सहन करावा लागला होता. त्याला तुरुंग आणि न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या होत्या.

फरदीन खान
दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोझ खान यांचा मुलगा आणि अभिनेता फरदीन खानचाही या यादीत समावेश आहे. फरदीन सन २००१ मध्ये कोकेन खरेदी करताना सापडला होता. यावेळी त्याला पोलिसांनी मुंबईतील जुहू परिसरातून अटक केली होती. यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता.

विजय राज
तुम्ही जर ‘रन’ चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला त्यातील एक सीन नक्कीच आठवत असेल, तो म्हणजे, ‘कव्वा बिर्याणी’ होय. हा सीन खूप प्रसिद्ध झाला होता. या सीनमध्ये विजय राज यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. याच विजय राज यांना सन २००५ मध्ये ‘दीवाने हुए पागल’च्या शूटिंगदरम्यान अबू धाबी पोलिसांनी अंमली पदार्थांसह पकडले होते. यानंतर त्यांनी ‘गुलाबो सिताबो’, ‘ड्रीमगर्ल’, ‘लूटकेस’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले.

https://www.instagram.com/p/CLYDIbdFyuT/?utm_source=ig_web_copy_link

शक्ति कपूर
प्रसिद्ध अभिनेते आणि आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खदखदून हसवणारे अभिनेते शक्ति कपूर हेदेखील वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. सन २००५ मध्ये एका टीव्ही रिपोर्टरला त्यांनी अपशब्द वापरले होते. ते म्हणाले होते की, “मला तुला प्रेम द्यायचे आहे आणि जर तुला चित्रपटसृष्टीत यायचे असेल, तर मी तुला जे सांगेल, ते करावे लागेल.” यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.

शायनी आहुजा
अभिनेता शायनी आहुजावर गंभीर आरोप करण्यात आला होता. सन २०११ मध्ये त्याच्या घरात काम करणाऱ्या महिलेने त्याच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात तो दोषी आढळला होता. त्यानंतर त्याला तब्बल ७ वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, सन २०१५ मध्ये तो ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात छोट्याशा भूमिकेतही झळकला होता, पण प्रेक्षकांना त्याची भूमिका जराही आवडली नव्हती. त्याने केलेल्या वाईट कृत्यामुळे त्याची कारकीर्द उद्ध्वस्त झाली होती.

श्वेता बसू प्रसाद
अभिनेत्री श्वेता बसू प्रसादचाही या यादीत समावेश होतो. ती सन २०१४ मध्ये वेश्याव्यवसायात सापडली होती. हैद्राबाद येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी तिला पकडले होते. यानंतर मात्र तिला सुधारगृहात पाठवण्यात आले होते. सध्या श्वेता या सर्व गोष्टींपासून खूप दूर असून ती आपल्या अभिनयावर लक्ष देत आहे.

मंदाकिनी
‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट तर तुम्ही पाहिलाच असेल, नाही का? या चित्रपटामुळे मंदाकिनी ही अभिनेत्री खूपच प्रसिद्ध झाली होती. मात्र, तिचे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे काही फोटो लीक झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. दोघांचेही फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या नात्यावरील बातम्या समोर आल्या होत्या. या सर्वांमुळे तिची चित्रपट कारकीर्द उद्ध्वस्त झाली होती.

अमन वर्मा
‘स्टिंग ऑपरेशन’ने अनेक कलाकारांचे पितळ उघडे पाडले आहे. यामध्ये अमन वर्माचाही समावेश आहे. टीव्ही जगतात नाव कमावलेला अमन वर्मा स्टिंग ऑपरेशनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. एका चॅनेलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये तो एका मुलीला काम देण्याच्या बहाण्याने चक्क शारीरिक सुखाची मागणी करताना सापडला होता. त्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला होता.

ममता कुलकर्णी
सलमान खानसोबत ‘करण अर्जुन’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी तुम्हाला आठवतच असेल. तिने आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, तिने दुबईतील अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विकी गोस्वामीसोबत संसार थाटला होता. मात्र, ती नेहमीच या बातमीला अफवा असल्याचे सांगते. ती तब्बल १० वर्षे विकीसोबत दुबईत राहिली होती. विशेष म्हणजे असेही म्हटले जाते की, ती तिचा पती विकीसोबत त्याच्या बेकायदेशीर कामांमध्ये त्याची साथ देत असायची.

अंडरवर्ल्डमुळेच तिला अनेक चित्रपटात काम मिळाल्याचे म्हटले जाते. या सर्वांमुळे ती भलतीच चर्चेत होती. विशेष म्हणजे, तिचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबतही संबंध असल्याचे म्हटले जाते.

राज कुंद्रा
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राही या यादीत सामील आहे. राजला अश्लील चित्रपट बनवल्यामुळे मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. राज कुंद्राला २३ जुलै, २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

https://www.instagram.com/p/B4zscyaADQP/?utm_source=ig_web_copy_link

तो एका परदेशी ऍपसाठी अश्लील चित्रपट बनवायचा, ज्याचे चित्रीकरण मुंबईतील मड आयलँड येथे व्हायचे. मात्र, या प्रकरणात राज कुंद्राला बेल मिळाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानला देण्यात आलीत विज्ञानाची पुस्तके, इतर आरोपींप्रमाणे त्यालाही मिळतंय नॅशनल हिंदू रेस्टॉरंटमधील जेवण

-‘ते तर या पार्टीमध्ये जाण्यास तयार देखील नव्हते…’, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांनी सोडले मौन

-शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’

हे देखील वाचा