Wednesday, July 3, 2024

धक्कादायक! टीव्ही जगतातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला देहविक्रीचे रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक

सिनेसृष्टीमधे चालणाऱ्या सेक्स रॅकेटला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मुंबईच्या क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीमध्ये हे देहविक्रीचे जे रॅकेट चालू आहे, ते इंडस्ट्रीमधील कास्टिंग दिग्दर्शकच चालवत असल्याचा मोठा खुलासा त्यांनी केला आहे. कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तल या रॅकेटच्या मागे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी आरतीला अटक केली असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

क्राइम ब्रँचच्या गोरेगाव टीमने एका ठिकाणाहून दोन मॉडेल्सला सोडवण्यात आले असून त्यांना रिहैब सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. त्या मॉडेल्सने सांगितले की, आरतीने त्यांना १५ हजार रुपये देण्याचे सांगितले होते. पोलिसांनी डमी ग्राहकांना हॉटेलमध्ये पाठवले आणि यातूनच या रॅकेटचा खुलासा झाला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या रॅकेटचा माहिती पोलीस इन्स्पेक्टर असणाऱ्या मनोज सुतार यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी एक टीम बनवली आणि एकाला डमी ग्राहक बनवून पाठवण्यात आले. त्यानी केलेल्या प्लॅननुसार डमी ग्राहकाने आरतीशी संपर्क केला आणि मित्रांसाठी दोन मुली पाठवण्यास सांगितले. या कामासाठी आरतीने ६० हजर रुपये मागितले. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार तिला तेव्हा अटक करण्यात आली जेव्हा विविध प्रोजेकटसाठी तिचे देहविक्रीमध्ये सामील होण्यासाठी चांगले पैसे ऑफर केले गेले होते.

आरती मित्तल कास्टिंग दिग्दर्शक असण्यासोबतच एक चांगली अभिनेत्री देखील आहे. तिने ‘अपनापन’ नावाच्या टीव्ही शोमध्ये काम केले होते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावरून माहिती दिली होती की, ती आर माधवनसोबत एका सिनेमाची शूटिंग करत आहे. सध्या आरती पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस याचा अधिक तपास करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महिमा चौधरीला तिच्या कॅन्सरमधून बरे होण्यासाठी ‘हा’ शो ठरला महत्वाचा, अभिनेत्रीने मानले आभार

आर माधवनचा लेक वेदांतने पुन्हा एकदा देशासाठी जिंकली 5 सुवर्णपदके; अभिनेता म्हणाला, “आम्हाला अभिमान आहे…”

हे देखील वाचा