Saturday, July 6, 2024

ओळखा पाहू मी काेण? आज आहे बाॅलिवडूचा सुपरस्टार, बायकाे करते रग्गड कमाई

बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरसाेबत दिसणारा हा मुलगा आता मोठा झाला असून बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे. याने एकापेक्षा एक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत. अलीकडेच, त्याचा चित्रपट सुपरहिट झाला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे, त्याची पत्नी देखील बॉलीवूडची सुपरस्टार आणि लाेकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याचबरोबर त्या मुलाचे पालक देखील लोकप्रिय स्टार राहिले आहेत. हा मुलगा दुसरा काेणीनसून कपूर कुटुंबातील सदस्य आहे. 

कदाचित आत्तापर्यंत तुम्ही करिश्मासाेबत असलेल्या या मुलाला ओळखले असेल, तर फोटोत दिसणारे हे मूल दुसरे तिसरे कोणी नसून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आहे. रणबीरने याच वर्षी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सोबत लग्न केले. नुकताच दोघांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. रणबीर आणि आलिया लवकरच पालक होणार आहेत.

रणबीरचे पालक लाेकप्रिय कलाकार ऋषि कपूर आणि नीतू सिंग आहे, तर राजकपूर त्याचे आजाेबा आहेत. तो कपूर घराण्याचा दिवा असून त्याने चित्रपटसृष्टीत आपल्या कुटुंबाचे नाव रोशन केले आहे. करिश्मा कपूर आणि करीना कपूर त्याच्या बहिनी आहेत, ज्या बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्री आहेत.

या चित्रपटातून करिअरला केली सुरुवात 
रणबीरने 1996 मध्ये राजीव कपूर दिग्दर्शित ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाद्वारे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याचे वडील ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. यानंतर रणबीरने शमशेरा, ब्रह्मास्त्र, राॅकस्टर, बर्फी, बाॅम्बे टाॅकीज, बेशरम, राॅय , यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले.

रणबीरची वार्षीक कमाई
रणबीर कपूरच्या कमाईचे मुख्य साधन म्हणजे त्याचे चित्रपट आणि जाहिराती. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो प्रत्येक चित्रपटासाठी  20 ते 25 कोटी घेतो. यासोबतच जाहिराती हा त्याच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. रणबीर कपूरची एकूण संपत्ती 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तो एका महिन्यात तीन कोटींहून अधिक कमावतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टेलरने मालामाल होण्याची संधी सोडली, संविधानावरील ‘या’ प्रश्नाचे उत्तर देत बनला असता 50 लाखांचा मालक
मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत व्यक्तीने लावले जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून तोंडात घालाल बोटे

हे देखील वाचा