बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा खूप दिवसांपासून कोणताच चित्रपत प्रदर्शित झाला नव्हता. पण सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच त्याच्या चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. काही दिवांपूर्वीच त्याचे ‘लूट गये’ हे रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले होते. त्याचे हे गाणे सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. एवढंच नाही तर या गाण्यावर अनेकांनी डान्स देखील केला आहे, हे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड देखील केले आहेत. त्याच्या याच गाण्यावरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एका मुलीने जबरदस्त डान्स केला आहे.
मुस्कान कालरा असे त्या मुलीचे नाव असून तिने यूट्यूबवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट देखील येत आहेत. या व्हिडिओमध्ये मुस्कानने जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये मुस्कानने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. या व्हिडिओमधील डान्स स्टेप्स सगळ्यांना भुरळ घालत आहेत. तिच्या व्हिडिओवर प्रेक्षकांकडून खूप लाईक्स आणि कमेंट्स येताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे.
मुस्कान अनेक गाण्यावर डान्स स्टेप करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या सगळ्या व्हिडिओंना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो.
इमरान हाश्मीच्या लूट गये या गाण्याचे संगीत खूपच छान आहे. प्रत्येक तरुणाला हे संगीत खूपच आवडत आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये इमरान हाश्मी सोबत युक्ती थरेजा देखील आहे. तसं बघायला गेलं, तर सोशल मीडियावर कोणती माहिती किंवा व्हिडिओ कधी केव्हा आणि कसा व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आपल्या टॅलेंटला प्रदर्शित करण्यासाठी सोशल मीडिया हे एक सगळ्यांसाठी वरदान म्हणायला वावगे ठरणार नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मुस्कान कालरा.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-व्वा! प्रियंका सिंग- नीलम गिरीचे नवीन गाणे रिलीझ, काही तासातच मिळाले ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज
-आलियानंतर आता श्रद्धा कपूरही बनली ‘जलपरी!’ शेअर केला अंडरवॉटर व्हिडिओ
-मलायका अरोराची हॉटनेस पुन्हा चर्चेत; स्विमिंग पूलवरील फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा!