Sunday, April 14, 2024

अभिनेता ते राजकीय नेता ‘असा’ आहे नंदामुरी बालकृष्ण यांचा जीवनप्रवास; एकदा वाचाच

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्यांपैका एक नाव म्हणजे नंदामुरी बालाकृष्ण होय. नंदामुरी यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यांना मेगास्टार म्हणून देशभरात आणि जगभर ओळखला जाते. नंदामुरी बालकृष्ण यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांचा प्रवास आजही सुरू आहे. नंदामुरी बालकृष्ण यांनी शनिवारी 10 जून रोजी त्यांचा 63 वा वाढदिवस साजरा केला.

नंदामुरी (Nandamuri Balakrishna) यांनी वयाच्या १४ व्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे. 1974मध्ये नंदामुरी बालकृष्णाने ‘ततम्मा कला’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. हा चित्रपट त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केला होता. अभिनयात अनेक दशके दिल्यानंतर त्यांनी राजकारणातही पाऊल ठेवले.

नंदामुरी बालकृष्ण हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचे पुत्र आहेत. 2014 मध्ये त्यांनी हिंदूपूरमधून आमदार म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. नंतर 2019 मध्ये ते याच मतदारसंघातून विजयी झाले. नंदामुरी बालकृष्ण जितका मोठा अभिनेता आहे तितकाच मोठा नेता देखील आहेत. ते अनेक वर्षांपासून हा मेगास्टार हैद्राबाद येथील बसवतारकम इंडो अमेरिकन कॅन्सर हाॅस्पिटलच्या माध्यमातून कर्करोगाच्या अनेक रुग्णांना मोफत उपचार देत आहे.

बालकृष्ण यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले आहे. त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी आतापर्यंत 107हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. टॉलीवूडमध्ये बालकृष्ण हे बलय्या किंवा एनबीके या नावाने प्रसिद्ध आहेत. अभिनेत्याचे आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तेलुगू राज्यांमध्ये खूप चाहते आहेत. विशेष म्हणजे नंदामुरी बालकृष्ण त्यांच्या शेवटच्या ‘रूलर’ या चित्रपटात दुहेरी भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात त्यांनी राजकारणी आणि पोलिसाची भूमिका साकारली होती. (This is the life journey of Nandamuri Balakrishna from actor to political leader)

अधिक वाचा-
‘त्याने मला जीवे मारण्याची सुपारी… ‘; ‘या’ अभिनेत्याने केले अक्षय कुमारवर गंभीर आरोप
‘बिग बॉस OTT 2’ मध्ये मिया खलिफाची एन्ट्री? सलमान खानसोबत घालणार धुमाकूळ

हे देखील वाचा