Thursday, June 13, 2024

‘बिग बॉस OTT 2’ मध्ये मिया खलिफाची एन्ट्री? सलमान खानसोबत घालणार धुमाकूळ

सलमान खानच्या मोस्ट अवेटेड शो ‘बिग बॉस ओटीटी 2‘ चा ग्रँड प्रीमियर जसजसा जवळ येत आहे, तसतशी शोबद्दलची उत्सुकता वाढत आहे. या वेळी हा शो सलमान खान होस्ट करणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निर्मात्यांनी शोचा प्रोमो देखील रिलीज केला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता शोच्या स्पर्धकांवर आहेत. ‘बिग बॉस ओटीटी 2’ यावेळी जिओ सिनेमावर स्ट्रीम होत आहे.

दर आठवड्याला एक नवीन धमक देण्याच्या वचनासह, OTT प्लॅटफॉर्म आता सलमान खानचा हा शो ऑल टाईम हिट बनवण्यासाठी सज्ज झाला आहे. बिग बॉसच्या घरात बंदिस्त झालेल्या स्पर्धकांपैकी एक नाव असे आहे की, ते ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. हे नाव इतर कोणाचं नसून मिया खलिफाचं (Mia Khalifa) आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, मिया ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये येण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. पण अद्यापही या विषयी काहीही माहिती समोर आलेली नाही. पण ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मियाला बिग बॉस 9 साठी देखील बोलावण्यात आले होते. बिग बॉसमध्ये एडल्ट स्टार्स येणे ही काही नवीन गोष्ट नाही, हा ट्रेंड सनी लिओनीपासून सुरू झाला आहे.

बिग बॉसनंतर सनीचे करिअर बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहचले. कदाचित मिया खलिफालाही असेच काहीतरी हवे असेल. कारण तिने एडल्ट चित्रपट करणे बंद केले आहे. आता तिला पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे आहे. मियाचे जगभरातील चाहते या बातमीने खूप खूश आहेत. चाहते तिला बिग बॉस OTT वर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसरीकडे, अशीही बातमी आहे की, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रालाही बिग बॉस ओटीटी 2मध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. (Mia Khalifa’s entry in ‘Bigg Boss OTT 2’)

अधिक वाचा-
भोजपूरी इंडस्ट्रीवर राज्य करतात ‘या’ पाच अभिनेत्री; सौंदर्यापासून ते संपत्तीच्या बाबतीत आहेत सर्वांत प्रथम
दु:खद! प्रसिद्ध अभिनेते मंगल ढिल्लोन यांचे निधन, सिनेसृष्टीत शोककळा

हे देखील वाचा