कपिल शर्मा शो प्रत्येक आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज असतो. आठवडाभराचा संपूर्ण शीण दूर करण्यासाठी कपिल शर्मा शो उत्तम टॉनिक आहे. प्रत्येक आठवड्याला या शोमध्ये वेगवेगळे कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी येत असतात आणि त्याच्या सोबत कपिल शर्मा खूप मजा, मस्ती करतो. अलीकडेच सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावत त्यांच्या आगामी ‘भूत पोलिस’ चित्रपटाचे प्रमोशन केले.
शोदरम्यान सैफने कपिलवर त्याची नाराजगी व्यक्त केली. कपिलने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये सैफ अली खान कपिल शर्माला सांगत होता की, तो कपिलवर रागावला आहे म्हणून. व्हिडिओमध्ये सैफ, यामी आणि जॅकलिन ग्रीन रूममध्ये दिसत आहेत. सैफ त्यांना विचारतो कपिल कुठे आहे, तो अजून आला नाही का? तेवढ्यात कपिल ग्रीन रूममध्ये येतो, आणि तिन्ही कलाकारांना हाय, हॅलो करतो. तेवढ्यात सैफ कपिलला बोलतो की, मी सेटच्या डिझायनरवर खूप नाराज आहे. मी तुमच्यासोबत दहा शो केले. तरीही माझा एकही फोटो येथे नाही. त्यानंतर, शक्ती कपूरच्या फोटोकडे बोट दाखवत सैफ म्हणाला की, इथे साहेबांचा फोटो आहे. सैफची ही चर्चा ऐकून तिथे उभे असलेले सगळे लोक जोरजोरात हसायला लागले.
नंतर व्हिडिओच्या दुसऱ्या भागातही सैफ पुन्हा आपली नाराजी व्यक्त करत म्हणतो की, ग्रीन रूममध्ये माझा एकही फोटो नाही, मी या शोमध्ये १० वेळा आलो आहे ,पण आतापर्यंत माझा एकही फोटो ग्रीन रूममध्ये नाही याचं मला खूप वाईट वाटत आहे. मात्र, नंतर सैफनेच केले कपिल शर्मा शोचे कौतुक.
कपिल शर्माने दीर्घ ब्रेक घेतल्यानंतर ‘द कपिल शर्मा’ शोचा तिसरा सीझन घेऊन परतला आहे. अजय देवगण या शोच्या पहिल्या भागात आला होता. आतापर्यंत अक्षय कुमार, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, उदित नारायण यांच्यासह अनेक सेलिब्रिटी कपिलच्या शोमध्ये आले होते. शोच्या आगामी भागात विकी कौशल त्याच्या आगामी ‘सरदार उधम’ चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी येणार आहे. या शोमध्ये विकीसोबत शूजित सरकारही येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\
-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल
-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद