Wednesday, July 3, 2024

“प्रत्येकाची वेळ ठरलेली…” मराठी अभिनेत्याने वेळेबद्दल पोस्ट करत फोडला लोकांच्या ‘त्या’ भ्रमाचा भोपळा

आपल्याला आयुष्यात सगळे काही पुन्हा मिळवता येते, मात्र वेळ सोडून. गेलेली वेळ कधीही परत येत नाही. त्यामुळे नेहमीच अनुभव जाणकार लोकं वेळेचा सदुपयोग करण्याबद्दल बोलताना दिसतात. वेळ ही एकमेव अशी बाब आहे जी तिची तिची पुढे जात असते, तिला कोणत्याही आधाराची गरज नसते. मात्र आपले दुर्दैव म्हणजे आपल्याला वेळ गेली की शहाणपण येते. वेळेची किंमत आपल्याला ती निघून गेल्यानंतरच समजते. अशा या वेळेचे आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे.

याच वेळेबद्दल आपले अनुभव आणि विचार मराठीमधील एका अभिनेत्याने त्याच्या लेखणीमधून व्यक्त केले आहेत. आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहचलेले मिलिंद गवळी हे त्यांच्या अभिनयाइतकेच त्याच्या सोशल मीडिया पोस्टसाठी देखील ओळखले जाऊ लागले आहेत. त्याच्या लिखाणाच्या प्रेमात अनेक लोकं असल्याचे आपल्याला सर्रास पाहायला मिळते. मिलिंद हे नेहमीच त्यांच्या लिखाणातून अतिशय वेगवेगळ्या आणि रंजक विषयांवर त्यांचे मत व्यक्त करताना दिसतात. आता देखील त्यांनी त्यांच्या लिखाणातून वेळ या अनमोल विषयावर भाष्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “Growing old Gracefully
मराठी अनुवाद – आकर्शकपणे वयस्कर होणे ,
Time is ticking all the time for all of us.
And we are getting old every second ,every moment,
वेळ कोणासाठी थांबत नाही,
आणि असं म्हणतात ही वेळेतच सगळं व्हायला हवं, एकदा का वेळ निघून गेली की मग तुम्हाला काहीही करता येत नाही, आणि
दुर्दैव असा आहे की खूप कमी लोकांना वेळेचे महत्त्व आहे,
बऱ्याचशा लोकांना स्वतःच्या तर नाहीच पण दुसऱ्याच्या ही वेळेची अजिबात किंमत नासते.
खरंतर वेळ पाळणे punctuality हा एक वेगळाच गहन विषय आहे. यावर तर मला खूपच बोलायचं आहे, पण सविस्तरपणे नंतर
पण आज, Gracefully जगणं म्हणजे काय?
याविषयी थोडं बोलावसं वाटतं,
खूप लोकांना असं वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे,
पण खरंतर खूप वेळ हा कोणाकडेच नसतो,
प्रत्येकाची वेळ ठरलेली असते,
एक कलाकार म्हणून मी ज्यावेळेला माझ्या क्षेत्रातल्या काही लोकांकडे बघतो, आणि मला त्या लोकांचं खूप कौतुक वाटतं त्यांच्याकडे बघून छान वाटतं, आपण पण त्यांच्यासारखं व्हायला हवं किंवा त्यांचे काही गुण आपण घ्यायला हवेत
असं सतत वाटत असतं, केरलाचे मोहनलाल यांच्याबरोबर मी काम केलं आहे मला हा कलाकार फार ग्रेसफुली जगतो आहे असं वाटतं, तसंच मी प्राण साहेबांबरोबर काम केलं होतं,
ज्या वेळेला त्यांच्याबरोबर सिनेमा केला त्यावेळेला त्यांचं वय होतं 85, या वयात सुद्धा ते फार ग्रेस फुल होते, मी निळू भाऊ बरोबर ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला सुद्धा त्यांचं वय होतं 77-78 खूप graceful होते ते, पंडित जसराज यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध होते , वयाच्या 90 मध्ये सुद्धा ते इतकं सुरेख गायचे, स्वर्गातून परमेश्वर येऊन त्यांचं गायन ऐकत बसत असतील असं वाटायचं, माझे वडील Shri Shriram Gawali वयाच्या 84 वर्षात जितक्या उत्साहानेएनर्जीने काम करतात , मला इन्स्पिरेशन inspiration दुसरीकडे कुठेही बघायची गरजच नाही.”

मिलिंद यांनी त्याच्या या पोस्टमधून वेळेबद्दल बोलताना अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या आयुष्यात कधी वेळेवर मत केली आणि यश मिळवले हे उदाहरणासह सांगितले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

रेल्वेत मराठी भाषेची होणारी मुस्कटदाबी पाहून मराठी अभिनेत्याने व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केला संताप

बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्यांमध्ये अतुट विश्वास; नावं पाहून तुम्हीही म्हणाल ‘जोडा असावा तर असा’

हे देखील वाचा