Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॉलिवूडनंतर ‘हा’ मराठमोळा अभिनेता साऊथ इंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज! पोस्टमधून दिली पहिल्या दाक्षिणात्य सिनेमाची माहिती

श्रेयश तळपदे मराठी इंडस्ट्रीमधील हँडसम आणि प्रतिभावान अभिनेता. श्रेयसने त्याच्या प्रभावी अभिनयाने मराठीमध्ये चित्रपट, मालिका, नाटक अशा सर्वच माध्यमांमध्ये आपले एक विशेष ओळख निर्माण केली. पुढे त्याने हिंदी विश्वात देखील पदार्पण केले आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘इक्बाल’ सिनेमात त्याने केलेल्या अभिनयनांतर तर अनेक दिग्गज कलाकार देखील त्याचे फॅन झाले. श्रेयश मराठी आणि हिंदीमधील एक नावाजलेला अभिनेता बनला. मात्र यातच त्याला एक वेगळी ओळख दिली २०२० या वर्षाने.

श्रेयससाठी २०२० हे वर्ष खूपच वेगळे आणि महत्वाचे ठरले. यावर्षी अल्लू अर्जुनाचा ‘पुष्पा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाने दाक्षिणात्य इंडस्ट्रीसोबतच हिंदीमध्ये देखील अमाप लोकप्रियता मिळवली. याच पुष्पा सिनेमामधील अल्लू अर्जुनच्या पात्रासाठी श्रेयसने हिंदीमध्ये डबिंग करत त्याला आवाज दिला होता. या नव्या ओळखीमुळे त्याच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली. या डबिंगमुळे त्याची दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये देखील एक ओळख निर्माण झाली. तिथे देखील त्याला अमाप लोकप्रियता मिळाली. याच कारणामुळे श्रेयस आता चक्क एका साऊथ सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

खुद्द श्रेयसने सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर करत ही माहिती सर्वाना दिली आहे. श्रेयसने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझा पहिला साउथ फीचर सिनेमा… तुम्ही मला दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनसाठी खूप प्रेम दिले, आता तर तुम्हाला मला दाक्षिणात्य चित्रपटाचा हिरो म्हणून पाहता येणार आहे… नवीन सुरुवात.” यासोबतच त्याने काही टिमसोबतचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. त्याच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्सने आणि इंडस्ट्रीमधल्या लोकांनी आनंद व्यक्त करत त्याचे अभिनंदन केले आहे.

दरम्यन श्रेयस काम करत असलेला सिनेमा कन्नड भाषेत असणार असून, त्याचे नाव ‘अजग्रथा’ आहे. हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे” सीबीआयच्या छापेमारीनंतर समीर वानखेडे यांनी व्यक्त केली भावना

“जरा सेटपर्यंत सोडतो का?” अमिताभ बच्चन यांनी चक्क रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट

हे देखील वाचा