आपल्या जादूई आवाजाने भारतीय संगीत जगताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या गायिकांमध्ये लता मंगेशकर यांचे नाव घेतले जाते. ज्या आवाजाने तब्ब्ल 7 दशकांच्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन केलेल्या लता दीदींनी वयाच्या 93 वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता दीदी जरी आपल्यात नसल्या तरी त्यांची गाणी सदैव आपल्याला त्यांची आठवण करून देतील. लता मंगेशकर यांनी संपूर्ण जगात हिंदी गाण्यांना ओळख मिळवून दिली. मात्र, त्यांनी फक्त हिंदी नाही तर भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमधील गाण्यांना जागतिक ओळख मिळवून दिली. आज (06 फेब्रुवारीला) लता मंगेशकर यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या संगीत प्रवासाबद्दल.
लता मंगेशकर (lata mangeshkar) यांनी तब्ब्ल 36 भाषांमध्ये गाणी गायली. दीदींनी दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील खूप गाणी गायली आहेत. दीदींनी 1988 साली ‘सत्या’ सिनेमात गाणी गात तामिळ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. सुरेश कृष्ण दिग्दर्शित या सिनेमात दीदींनी एसपी बालसुब्रमण्यम यांच्यासोबत एक गाणे गायले.
या गाण्याबद्दल आठवणी सांगताना सुरेश कृष्ण म्हणतात, “माझा जन्म मुंबईत झाला. माझे बालपण, तरुणपण सर्व मुंबईतच गेले. लहानपणापासून मी लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफ़ी यांची गाणी ऐकतच मोठा झालो. लताजी माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होत्या. जेव्हा मी बालाचंदर सर यांच्यासोबत ‘एक दूजे के लिए’ (Ek Duuje Ke Liye) साठी काम करायला सुरुवात केली तेव्हा, माझे एक स्वप्न पूर्ण झाले. त्या माझ्यासमोर होत्या आणि त्यांनी सिनेमासाठी ‘तेरे मेरे बीच मैं’ गाणे रेकॉर्ड केले.”
पुढे ते म्हणाले, “लता मंगेशकर यांना लाईव्ह बघणे आणि स्पिकर्सवर त्यांचा आवाज ऐकणे रोमांचकारी अनुभव होता. त्यांना या गाण्यात काही तामिळ ओळी देखील होत्या ज्या त्यांना गायच्या होत्या. एसपीबी सरांनी त्यांना तामिळ ओळी हिंदीमध्ये भाषांतरित करून दिल्या होत्या. पुढे त्यांना अजून एक तामिळ गाण्यासाठी आम्ही आमंत्रित केले. दीदी गाणे रेकॉर्ड करण्याच्या आधी त्यांना तयारीला खूप वेळ लागायचा. त्यांची मागणी होती की, गाण्याचे बोल आधी त्यांना पाठवावे. मग राजा सरांनी त्यांच्या आवाजात गाणे रेकॉर्ड करून त्यांना पाठवले. दीदींनी ते गाणे हिंदीमध्ये लिहून काढले. त्यांना गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी एसपीबी सरांनी खुच मदत केली. रेकॉर्डिंग बुथमधून बाहेर आल्यानंतर सर्वांना विचारायच्या माझे उच्चार बरोबर होते ना? त्यांचे त्यांच्या कामाप्रती आणि संगीताप्रती असलेले समर्पण विलक्षण होते. त्यांचा आवाज आणि तोही तामिळ भाषेत म्हणजे स्वर्ग सुखच होते. आजही दीदींचा आवाज आपला दिवस उत्तम करत असतो.” लता मंगेशकर यांनी 30 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली असून, त्यांनी ‘आनंदघन’ या नावाने काही गाण्यांना संगीत देखील दिले आहे.(this song was very difficult for lata mangeshkar and it was recorded with the help of sp balasubrahmanyam)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लता मंगेशकर यांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारे ‘हे’ आहेत त्यांना मिळालेले सर्वोच्च पुरस्कार
काय असतो ग्रॅनी अवॉर्ड? नामांकन प्रप्त झालेल्या यादीत एर आर रहमान आणि गुलजार यांचेही नाव