Friday, July 5, 2024

जानेवारीत इंटरनेटवर धूमाकूळ घालत असलेला ‘हा’ व्हिडीओ पाहिलाय का? धनश्रीने धरलाय ‘परी हूं मैं’ ठेका

भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर, यूट्युबर धनश्री वर्मा हे मागच्या महिन्यात २२ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. धनश्री ही एक यूट्युबर असून ती नेहमीच तिचे नवनवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. धनश्रीने नुकताच तिचा एक नवीन डान्स व्हिडिओ तिच्या चॅनेलवर अपलोड केला आहे. ह्या व्हिडिओला तिच्या चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येत आहे.

धनश्रीने तिच्या लग्नानंतर  ‘परी हूं मैं’ असे शीर्षक देत पहिलाच डान्स व्हिडिओ अपलोड केला आहे. ती या व्हिडिओमध्ये ‘परी हूं मैं’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गुलाबी आणि ग्रे रंगाच्या लेहेंग्यात नाचणारी धनश्री खरंच कोणत्याही परी पेक्षा कमी दिसत नाहीये.

धनश्रीच्या या व्हिडिओला अगदी कमी वेळात तीन लाखांपेक्षा जास्त व्हियूज आले आहेत. या व्हिडिओमधल्या तिच्या डान्स स्टेप्स, तिचे एक्सप्रेशन, तिची एनर्जी, तिची स्टाईल खूप कमाल दिसत असून, ती तिच्या या अंदाजामुळे सर्वांना आकर्षित करत आहे.

धनश्रीच्या या व्हिडिओचे कौतुक करताना तिचे फॅन्स थकत नाहीये. याआधी देखील धनश्रीने वधूच्या वेशात एक व्हिडिओ अपलोड केला होता. तो व्हिडिओ देखील खूप वायरल झाला होता.

धनश्रीचे इंस्टाग्रामवर २५ लाख फॉलोवर्स आहेत. एकीकडे युजवेंद्र चहल हा त्यांच्या फॅनी व्हिडिओंमुळे चर्चेत असतो तर दुसरीकडे त्याची पत्नी धनश्री तिच्या डान्सच्या व्हिडिओंमुळे चर्चेत असते. धनश्रीचे इंस्टाग्राम सोबत एक यूट्यूब चॅनेल देखील आहे. ज्यात तिचे २२ लाख सब्सक्राइबर आहेत. धनश्री ही यूट्युबर आणि कोरिओग्राफरसोबत एक डॉक्टरही आहे.

हे देखील वाचा