Tuesday, April 23, 2024

‘खतरो के खिलाडीची ऑफर नाही’ ‘या’ टीव्ही अभिनेत्याने दिला त्याच्या शोमध्ये सहभागाच्या चर्चांना पूर्णविराम

टेलिव्हिजन स्टार करण टँकर हा सर्वांचाच आवडता अभिनेता आहे. त्याने त्याच्या लुक्सने, अभिनयाने आणि त्याच्या व्यक्तिमत्वाने सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. टेलिव्हिजनवर अनेक मालिकांमधून काम करत त्याने त्याची ओळख तयार केली. त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली ती ‘एक हजारो में मेरी बहना है’ या मालिकेने. ही टेलिव्हिजन विश्वातील अतिशय गाजलेली मालिका होती. या मालिकेमुळे अनेक कलाकार इंडस्ट्रीला मिळाली. करण मध्ये मध्ये विविध कार्यक्रमांमध्ये दिसत असतो, मात्र मालिकांमध्ये किंवा रियालिटी शोमध्ये तो अजून काही दिसला नाही. आता अचानक करण चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याला ऑफर झालेला एक शो.

मधल्या काळापासून सतत करण टँकर हा खतरो के खिलाडीमध्ये दिसणार असल्याच्या बातम्या येत होत्या. लवकरच जा शो सुरु होणार असून, शोमध्ये कोण कोणते कलाकार दिसणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. यातच करण देखील या शोचं अभंग राहणार असल्याचे समजत होते. मात्र आता करणने तो या शोमध्ये दिसणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने त्याला अजून कोणीही खतरो के खिलाडी या शोसाठी विचारणा केली नसल्यचे त्याने सांगितले.

माध्यमांमध्ये मिळणाऱ्या माहितीनुसार सांगण्यात आले होते की, करणशी केकेके 13 साठी संपर्क केला गेला असून, निर्माता आणि अभिनेता यांच्यात सर्व काही ठीक असले तर तो शोमध्ये नक्कीच दिसेल असे सांगण्यात येत होते. मात्र करणने त्याच्या स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “फक्त रेकॉर्डसाठी मी कोणताही रियॅलिटी शो करत नाही.”

काही दिवसांपूर्वीच त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, खतरो के खिलाडी शोचा भाग होणे खूपच हिमतीने काम आहे. हा शो केवळ भीती नाही तर आत्मिक शक्ती आणि भीती यावर आहे. त्याला देखील शोचा भाग व्हायला आवडेल असे त्याने स्पष्ट केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘माझा संघर्ष घरात प्रसिद्ध चेहरे असल्यामुळे…’ ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिच्या कठीण काळाबद्दल

प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टवरून नेटकऱ्यांनी उडवली तिची खिल्ली विचारले, “हा कोणता खेळ आहे”

हे देखील वाचा