Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड रागाच्या भरात महिलेने रस्त्यावर फेकून दिली फळविक्रेत्याची फळे; व्हिडिओ पाहताच भडकली गौहर खान, म्हणाली…

रागाच्या भरात महिलेने रस्त्यावर फेकून दिली फळविक्रेत्याची फळे; व्हिडिओ पाहताच भडकली गौहर खान, म्हणाली…

अनेकवेळा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे पाहून अनेकांचे हृदय तुटते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक संतप्त महिला एका गरीब विक्रेत्याची फळे रस्त्यावर फेकत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपासून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवर अभिनेत्री गौहर खानने (Gauahar Khan) प्रतिक्रिया दिली आहे.

हा व्हिडीओ भोपाळचा असून, रस्त्यावरील विक्रेत्याला तिच्या गाडीचा थोडासा स्पर्श झाल्याने ही महिला रस्त्यावरील विक्रेत्याच्या गाड्यावरील फळे जमिनीवर फेकत आहे. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ असाच अभिनेत्री गौहर खानपर्यंत पोहोचला. हा व्हिडिओ पाहून तिने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना गौहरने लिहिले की, “आश्चर्यकारक राग आहे. लाज वाटली पाहिजे, या फळ विक्रेत्याबद्दल माहिती देण्यासाठी मला मदत करा. मला त्याच्यासाठी त्याचा संपूर्ण रस्ता विकत घ्यायचा आहे. या महिलेमुळे त्याच नुकसान झाले…” इतकंच नाही, तर अनेकजण या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना युजर्सने लिहिले की, “ती खरोखर शिकलेली आहे का? आणि तिची वागणूक खरोखरच आश्चर्यकारक आहे.”

Photo Courtesy Instagramviralbhayani

प्रशासनापर्यंत पोहोचली तक्रार
माध्यमांतील वृत्तानुसार, कारमधील स्टिकरच्या आधारे महिलेची ओळख भोपाळ विद्यापीठाची प्राध्यापिका म्हणून करण्यात आली आहे. मात्र, अधिकृत ओळखीची पुष्टी झालेली नाही. भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लावनिया यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

गौहर खान आहे बिग बॉसची विजेती
गौहर खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती ‘बिग बॉस ७’ची विजेती आहे. गौहर ‘बिग बॉस १५’वर तिचे ट्वीट करत राहते. गौहर खानचा विवाह इस्माईल दरबारचा मुलगा जैद दरबारशी झाला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा