हॉलिवूड सुपरस्टार ख्रिस हेम्सवर्थ याचे नाव घेतले की, सर्वप्रथम सर्वांच्या तोंडात एकच नाव येते ते म्हणजे ‘थॉर’ होय. याच अभिनेत्याचा आगामी सिनेमा ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ हा सिनेमा येत्या गुरुवारी म्हणजेच ७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सुपरस्टार ख्रिसचा सिनेमा म्हटल्यावर या सिनेमाच्या तिकिटांची आगाऊ (ऍडव्हान्स) विक्रीही जोरात सुरू झाली आहे. या सिनेमाच्या तिकिटाचे दर काही चित्रपटगृहात तब्बल १८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. काही शहरांमध्ये सिनेमाचे शो गुरुवारी सकाळी ६.३० वाजेपासून, तर काही शहरांमध्ये पहिला शो रात्री १२.१५ वाजता सुरू होईल.
मार्व्हल स्टुडिओज (Marvel Studios) यांच्या मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘डॉक्टर स्ट्रेंज: इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस’ या सिनेमाला भारतात तुफान यश मिळाले होते. या सिनेमाने देशात १५० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती.
भारतात मार्व्हलचे जबरदस्त चाहते
भारतात मार्व्हलच्या चाहत्यांची संख्या सन २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘आयर्न मॅन’ सिनेमानंतर सातत्याने वाढत आहे. आता या सीरिजचे २८ सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. अशात ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ हा या सीरिजमधील २९वा सिनेमा आहे. ‘ऍव्हेंजर्स एंडगेम’ या सिनेमानंतर प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम’नंतर ही सीरिज चौथ्या टप्प्यात पोहोचली आहे. या टप्प्यातील आणखी ५ सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.
View this post on Instagram
आगाऊ तिकीट विक्रीतून कमावले कोट्यवधी रुपये
‘थॉर: लव्ह अँड थंडर’ या सिनेमाच्या आगाऊ तिकीट विक्रीतून मंगळवारी सायंकाळपर्यंतच्या आकड्यांनुसार या सिनेमाने जवळपास ९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक तिकीटे ही इंग्रजी भाषेतील या सिनेमाची विकली गेली आहेत. त्यांची कमाई एकूण ६.५० कोटी रुपये आहे. यानंतर हिंदी भाषेत डब केलेल्या या सिनेमाच्या तिकीट विक्रीतून २.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
भारतात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मार्व्हल सिनेमामध्ये ‘ऍव्हेंजर्स एंडगेम’ अव्वलस्थानी आहे. या सिनेमाने २०१९मध्ये ३७३.२२ कोटींची कमाई केली होती. भारतात प्रदर्शित होणाऱ्या हॉलिवूड सिनेमांमध्ये सर्वाधिक कमाई करणारे पहिले तीन सिनेमे मार्व्हलचे आहेत.
इतक्या कोटीत बनलाय सिनेमा
‘थॉर: लव्ह एँड थंडर’ या सिनेमाबाबत बोलायचं झालं, तर या सिनेमाच्या निर्मितीसाठी जवळपास १८५ मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल १४६३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा सिनेमा थॉर या एकट्या नायकाच्या सिनेमांमधील सर्वात महागडा सिनेमा मानला जात आहे. भारतात अमेरिकेच्याही आधी प्रदर्शित होत असलेला ‘थॉर: लव्ह एँड थंडर’ सिनेमा इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होत आहे. पहिल्या दिवशी देशातील तब्बल २८०० स्क्रीन्सवर हा सिनेमा दाखवला जाईल. पहिल्या दिवशी हा सिनेमा २५ कोटी रुपये कमावण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मार्व्हलच्या ‘डॉक्टर स्ट्रेंज: इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस’ या सिनेमाने भारतात पहिल्या दिवशी २८.३५ कोटींची कमाई केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मिका सिंगच नाही, तर ‘या’ सेलिब्रेटींनीही रचलं होतं स्वयंवर, पाहा पुढे काय झालं
बॉलिवूडमध्ये आपली जादू चालवण्यासाठी सज्ज झालीय समंथा, ‘या’ अभिनेत्याच्या चित्रपटातून करणार पदार्पण!
बॉबी देओल ते अभिषेक बच्चन, ओटीटीमुळे ‘या’ कलाकारांच्या संपलेल्या करिअरला मिळाली नवी उभारी