Wednesday, March 22, 2023

मोठी बातमी! किंग खानला मिळाली होती ‘ही’ मोठी धमकी, पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य वाटते तितके सोपे मुळीच नाही. त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. काही वेळा विचित्र चाहत्यांमुळे त्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो, तर कधी कधी त्यांना थेट धमक्याही दिल्या जातात. मात्र, असे काही कृत्य करणारा व्यक्ती नंतर पोलिसांच्या तावडीत सापडतोही. आताही असेच काहीसे झाले आहे. जगातील आलिशान बंगल्यामध्ये गणल्या जाणाऱ्या बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला त्याचा मन्नत बंगला बाँबने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आता त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

शाहरुखचा बंगला बाँबने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपी व्यक्तीला मध्यप्रदेश पोलिसांनी जबलपूर येथून अटक केली आहे. दहशतवादी हल्ले आणि बाँब स्फोट करण्याची धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीला संजीवनी नगर पोलिसांनी गेल्या शनिवारी (०८ जानेवारी) अटक केली. जितेश ठाकूर असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिसांना फेक कॉल करणाऱ्या आरोपीला जबलपूर पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. आरोपी जितेश ठाकूर हा संजीवनी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील गंगा नगर भागात राहत होता. या महिन्याच्या ६ तारखेला केलेल्या या फेक कॉलनंतर कॉल ट्रेस झाल्यानंतर मध्यप्रदेशातील जबलपूरचे नाव समोर आले. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणी जबलपूर पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने यापूर्वी अनेकदा सीएम हेल्पलाईनवर कॉल करून आणि १०० नंबर डायल करून त्रास दिला होता. दारू पिऊन तो अनेकदा सीएम हेल्पलाईनवर कॉल करायचा आणि १०० नंबर डायल करायचा. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

शाहरुखच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात झळकला होता. यानंतर आता तो ‘पठाण’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा