करिश्मा तन्नाने स्विमिंग पूलमधले बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर आपली जबरदस्त ओळख निर्माण करणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना हिचे लेटेस्ट फोटो सध्या इंटरनेटवर आहेत. या फोटोंमध्ये करिश्माचा अतिशय बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. करिश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

या फोटोंमध्ये करिश्मा (Karishma Tanna) स्विमिंग पूलमध्ये दिसत असून, निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिची बोल्ड स्टाईल इंटरनेटचा पारा चढवत आहे. तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर खूप लाईक केले जात आहेत. एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या या फोटोंना आतापर्यंत २ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna)

त्याचवेळी, तिचे चाहते करिश्माच्या या फोटोंवर सतत कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये करिश्माची तिचा प्रियकर आणि रिअल-इस्टेट व्यावसायिक वरुण बंगेरासोबत साखरपुडा झाला. माध्यमांतील वृत्तानुसार, आता करिश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

करिश्मा सध्या पडद्यापासून दूर आहे आणि आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. करिश्मा शेवटची ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटात दिसली होती. तिने या चित्रपटात ‘बसंती’ हा स्पेशल डान्स नंबर केला होता, ज्याचे सर्वांनी कौतुक केले होते.

View this post on Instagram

A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna)

करिश्मा ‘नच बलिये’, ‘बिग बॉस ८’, ‘झलक दिखला जा’ सारख्या काही मोठ्या रियॅलिटी शोचा देखील भाग राहिली आहे. ती ‘खतरों के खिलाडी १०’ची विजेती ठरली आहे. करिश्माने यापूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात भेटलेल्या उपेन पटेलला डेट केले होते.

View this post on Instagram

A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna)

या चित्रपटांमध्ये दिसली अभिनेत्री

करिश्माने २००६ मध्ये ‘दोस्ती: फ्रेंड्स फॉरएव्हर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिचा हा चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर ती २०१३ मध्ये ‘ग्रँड मस्ती’मध्ये दिसली होती. या चित्रपटात करिश्माने अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. याशिवाय २०१८ मध्ये राजकुमार हिरानीच्या ‘संजू’ चित्रपटात देखील ती दिसली होती. त्याचवर्षी तिने ‘करले तू भी मोहब्बत’ या वेबसीरिजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. ती २०२१ मध्ये ‘बुलेट’मध्ये दिसली होती.

हेही वाचा  :

Latest Post