झी मराठीवरील आताच सुरु झालेली ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप


झी मराठी ही आपल्या सगळ्यांची आवडती वाहिनी आहे. या वर्षी अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तर काही मालिका मात्र प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवण्यास अपात्र ठरल्या. यावर्षी एक-दोन नाही तर तब्बल पाच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यातीलच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात सुरु झालेल्या एका मालिकेने प्रेक्षकांना अगदी प्रोमोपासूनच घाबरवून सोडले होते. ती मालिका म्हणजे ‘ती परत आलीये’ मालिकेचा प्रोमो पाहून मालिका काहीतरी थरारक असेल असे अनेकांना वाटले होते.

ही मालिका मित्रांच्या जीवनावर आधारित आहे. कॉलेजमध्ये असताना एका मैत्रिणीचा नकळत मृत्यू होतो. स्विमिंगपूलमध्ये पडल्यानंतर तिला पाण्यात पोहता येत नसल्याने तिचा मृत्यू होतो आणि तिच्या मृत्यूचे कारण आपण सगळे आहोत असे तिच्या मित्रांना वाटते. हीच गोष्ट मनात घेऊन ते सगळे जगत असतात की, आपल्यामुळे तिचा मृत्यू झाला. अनेक वर्षांनी कोणीतरी त्यांना एकत्र बोलवतात आणि त्याच्याशी निलांबरी परत आलीये असे भासवतात. ( ti parat aaliye serial goes off air soon)

काही प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडली होती. परंतु काहींना मात्र ही मालिका खूप रटाळ आणि बोर वाटत होती. तसेच मालिकेची वेळ देखील अगदी उशिरा म्हणेजच १० : ३० वाजता होती. त्यामुळे देखील या मालिकेला कमी प्रतिसाद मिळाला. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १८ डिसेंबर रोजी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

या मालिकेच्या जागी ‘देवमाणूस २’ ही मालिका सुरु होणार आहे. ‘देवमाणूस’ मालिकेच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. मालिकेत एखादा व्यक्ती चांगुलपणाचा मुखवटा घेऊन कशाप्रकारे माणसांना फसवतो आणि त्यांचा खून करतो हे दाखवले होते. मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. मालिकेच्या दुसऱ्या भागाची देखील सगळ्यांना उत्सुकता लागली होती. अशातच या मालिकेचा दुसरा भाग १९ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री १० : ३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!