Saturday, August 2, 2025
Home अन्य ‘टायगर 3’ फेम अभिनेत्रीने मोनोकिनीमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, किलर अंदाज पाहून तुमच्याही तोंडून निघेल वाह!

‘टायगर 3’ फेम अभिनेत्रीने मोनोकिनीमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, किलर अंदाज पाहून तुमच्याही तोंडून निघेल वाह!

अभिनेत्री रिद्धी डोगराने तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. तिच्या अप्रतिम अभिनयामुळे ती छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय चेहरा आहे. नुकताच रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या ‘जवान‘ या चित्रपटातून तिने आईच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात रिद्धी डोगरा शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारत आहे. शाहरुख खानपेक्षा 19 वर्षांनी लहान असूनही रिद्धीने आईच्या भूमिकेत उत्तम काम केले आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भावनिक केल्याचे दिसून आले आहे.

रिद्धी डोगरानं (Riddhi Dogra ) एका मुलाखतीत सांगितले की, “मला शाहरुख खानसोबत काम करायचं होतं. जेव्हा मला या चित्रपटात काम करण्याची ऑफर आली तेव्हा मी खूप आनंदी झाले. ही एक सुवर्ण संधी होती आणि मी ती सोडली नाही. या चित्रपटात काम करताना मला खूप काही शिकायला मिळाले. शाहरुख खान एक उत्तम कलाकार आहेत आणि त्यांना काम करताना पाहून मला खूप प्रेरणा मिळाली.”

रिद्धी डोगरा सध्या सलमान खानच्या ‘टाइगर 3’ या चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.रिद्धी डोगरा ही एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाने ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. रिद्धी डोगराचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रिद्धी लाल रंगाच्या मोनोकिनीमध्ये समुद्र किनाऱ्यावर कहर करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ridhi Dogra (@iridhidogra)

या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या मोनोकिनीमध्ये तिच्या किलर लूकने धुमाकूळ घालत आहे. इतकंच नाही तर, रिद्धी डोगराचा समुद्र किनाऱ्यावरचा किलर लूक या फोटोंमध्ये भर पडत आहे. रिद्धी डोगराच्या या फोटोंना चाहते खूप लाइक आणि कमेंट करत आहेत. त्यामुळे अभिनेत्रीचे हे फोटो इंटरनेटवर वणव्यासारखे व्हायरल होत आहेत. (Tiger 3 fame actress Riddhi Dogra did a glamorous photoshoot in a monokini)

आधिक वाचा-
नील भट्ट आणि विकी जैनमध्ये जोरदार भांडण, अंकिताच्या नवऱ्याला मारण्यासाठी अभिनेता धावला, पाहा व्हिडिओ
‘या’ दिवशी कलाकारांच्या सन्मानासाठी रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान’ सोहळा

हे देखील वाचा