Thursday, March 28, 2024

‘मर्यादा लेकिन कब तक’ फेम रिद्धी डोगरा आहे फेमस मॉडेल, एकदा फोटो पाहाच

टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने ‘मर्यादा’ या कार्यक्रमापासून घरारात पोहोचली होती. तिने टीव्हीवरील अनेक कार्यक्रमामध्ये आपल्या दमदार अभिनयाने आपली भूमिका गाजवल्या आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर तीचा मोठा चाहता वर्ग आहे. ती आपले फोटो शेअर करत नेहमी सोशल मीडियीवर आपल्या चाहत्यांच्या नजरेत राहते. आज रिद्धी डोगरा आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे, या खास दिवशी रिद्धीचा अभिनय क्षेत्रात येण्याचा जीवनप्रवास पाहूया

टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगरा(Riddhi Dogra) या अभिनेत्रीचा जन्म 22 सप्टेंबर1984 ला दिल्लीमध्ये झाला होता. तिने आपले प्राथमिक शिक्षण दिल्लीच्या ‘एपीजे स्कूल’ मधून पूर्ण केले आणि ‘कमला नेहरु कॉलेजमधून’ साईकलॉजी (ऑनर्स) मध्ये आपले शिक्षण पुर्ण केले. अभिनय क्षेत्रात येण्याच्या आधी रिद्धी डोगरा एका ‘श्यामक डावर डांस इन्स्टिट्यूट’मध्ये एक डान्सर होती. या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीमध्ये निर्माती म्हणून केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ridhi Dogra (@iridhidogra)

रिद्धी डोगरा या अभिनेत्रीला 2007 साली पहिल्यांदा ‘झूम जिया रे’ या कार्यक्रमामध्ये पाहिले होते. यानंतर तिला साल 2008 मध्ये ‘राधा की बेटीया’ या कार्यक्रमामध्ये काम मिळाले होते. या कार्यक्रमानंतर तिने आपल्या करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने आपल्या दमदार अभिनयाने टेलिव्हिजन क्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. यानंतर ती अनेक कार्यक्रमाचा भाग बनली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ridhi Dogra (@iridhidogra)

तिने 2010 मध्ये स्टारप्लचा लोकप्रिय कार्यक्रम ‘मर्यादा – लेकिन कब तक?’ या कार्यक्रमाने तिला खरी ओळख निर्माण करुन दिली आणि ती घराघरात पोहोचली. हा कार्यक्रम खूपच गाजला होता, त्यामुळे रिद्धीला जास्त प्रमाणात लोक ओळखू लागले. हा कार्यक्रम करत असताना तिच्यासोबत अभिनेता राकेश बापट (Rakesh Bapat) हा मुख्य भुमिकेत होता, या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. ‘मर्यादा – लेकीन कब तक’ या सेटवर यांची पहिल्यांदा भेट झाली होती आणि यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी 2011 मध्ये लग्न केले. मात्र, यांचे लग्न फार काळ टिकले नाही सतत होणाऱ्या वादामुळे यांनी 2019 मध्ये घटस्फोट घेतला आणि आपले रस्ते वेगळे केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ridhi Dogra (@iridhidogra)

यानंतर रिद्धीने ‘द मॅरिड वुमन'(the married woman) आणि ‘असुर'(Asur: Welcome To Your Dark Side) सारख्या वेबसीरिजमध्ये काम केले. तिच्या वेबसीरिजमधल्या दमदार अभिनयाचे क्रिटीक्स आणि प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केले होते, तिच्या या सीरिज खूपच गाजल्या होत्या. पाहायला गेले तर रिद्धीही अभिनय क्षेत्रात जोडलेल्या कुटुंबातून आली आहे. रिद्धी डोगराचे काका स्वर्गीय अरुन जेटली हे वरिष्ठ भाजप नेते होते आणि त्यांचे भाऊ अक्षय डोगराही टीव्ही अभिनेते होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
शाहरूख खानच्या मुलीची भूमिका साकारलेली अंजली झालीये खूपच ग्लॅमरस, एकदा पाहाच
आर्यन खान प्रकरणावर आई गौरी खानचे वक्तव्य; म्हणाली, ‘आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो…’
राजूंना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांना समजलेली हैराण करणारी गोष्ट, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

हे देखील वाचा