इंडस्ट्रीचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याने दिवाळीच्या आधीच एक धमाकेदार खुलासा केला आहे. सलमान खानचे चित्रपट म्हटलं की, चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण हेते.त्याने नुकतंच अपल्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. अभिनेत्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे, जी तुफान व्हायरल होत आहे. चला तर जाणून घेऊया की भाईजानने नेमकं सरप्रइज दिले आहे.
अभिनेत्याच्या प्रत्येकच चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. प्रसिद्ध चित्रपट टायगरचा 1 आणि 2 भाग प्रेक्षकांच्या भोटीला आला असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच भेटीली येणार आहे. गेल्या दोन भागामध्ये सलमान खान (salman khan) आणि कॅटरिना कैफ (katrina kaif) च्या जोडीने चांगलाच राडा घातला होता. काही दिवसांनी कॅटचे लग्न झाले. एकेकाळी कपल असलेलं जोडपं लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना टायगर 3 ची आतुरता लागली आहे.
सलमानने काही दिवसांपूर्वी टायगर 3 चित्रपटाची घोषणा केली होती आता मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ठरवण्यात आली आहे. अभिनेत्याने नुकतंच आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन ट्वीवीट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे की, टायगर चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.
Tiger has a new date… Diwali 2023 it is! Celebrate #Tiger3 with #YRF50 only at a big screen near you. Releasing in Hindi, Tamil and Telugu. #katrinakaif | #ManeeshSharma | @yrf pic.twitter.com/74cyIoopt2
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 15, 2022
सलमानने इंस्टाग्रामवरही पोस्ट शेअर केली असून लक्षवेधणारे कॅप्शनही लिहिले आहे की, टायगर 3 दिवाळी 2023 मध्ये प्रदर्शित होणार असून तामिळ आणि तेलुगू भाषेतही पाहायला मिळणार आहे. दिवाळीवर प्रदर्शित करण्याचा आर्थ आहे की, चाहत्यांना अजून 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शहा आणि प्रोडक्शन आदित्य चोपडा करत आहेत. टायगर1 आणि 2 मध्ये सलमान आणि कॅटच्या जोडीने धमाल केली होती, आता पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर झळकण्यासाठी तयार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) ही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. यावर्षी शारुखने ‘ब्रह्मास्त्र’ मध्येही पाहुण्या कलाकाराची भुमिका साकारली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
मल्लिका शेरावतचा ‘मर्डर’ चित्रपटातील धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘भारतातील पुरुषांनी मला…’
‘इमली’ फेम फहमान खानने शालिन आणि सुंबुलच्या नात्यावर व्यक्त केली नाराजी, म्हणाला ती एक..