Tuesday, July 9, 2024

बहु प्रतीक्षित सिनेमा ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ मध्ये दिशा पाटणी सकरणार ही महत्वाची भूमिका!

सलमानचा यावर्षी येऊ घातलेला ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या बहु प्रतिक्षित सिनेमाची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. सलमानच्या या सिनेमात जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डा, दिशा पाटणी, जॅकलिन फर्नांडिस आणि खुद्द सलमान खान अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रख्यात नर्तक आणि दिग्दर्शक प्रभुदेवा करणार आहेत.
या चित्रपटात दिशा पाटणी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आता दिशाची भूमिका समोर आली आहे आणि खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात दिशाला प्रथमच जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करण्याची संधी मिळणार आहे.

तसही, दोघांनीही सलमानच्या भारत या सिनेमात काम केलं आहे, यामध्ये जॅकी सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत होते आणि दिशाने सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. परंतु, जॅकी आणि दिशाने त्या चित्रपटात स्क्रीन शेअर केली नव्हती. दिशा जॅकी यांचा मुलगा टायगरला तथाकथितरित्या डेट करत आहे आणि ती त्याच्या कुटुंबीयांच्या देखील जवळ आहे. मात्र, अद्याप दोघांनीही आपल्या नात्याबद्दल जाहीरपणे काही सांगितलेलं नाही. माध्यमांनुसार दिशा पाटणी राधेमध्ये जॅकी यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. जॅकी श्रॉफ राधेमध्ये पोलिस अधिकारी म्हणून झळकणार आहेत.

राधे चित्रपट २०२० मध्येच ईदेला प्रदर्शित होणार होता, पण कोरोना महामारीमुळे थिएटर्स आणि चित्रपटाचं चित्रीकरण लॉकडाऊनमुळे बंद झालं होतं, त्यामुळे राधे प्रदर्शित होऊ शकला नाही. २७ डिसेंबर २०२० रोजी त्याच्या वाढदिवशी सलमानने हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र ही तारीखही पुढे सरकली असून हा चित्रपट २१ मे २०२१ रोजी संपूर्ण जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल अशी चर्चा आहे.

केवळ राधे चित्रपटाचे चाहतेच नाही तर सिनेमागृहांचे मालकही या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप उत्सुक आहेत. अलीकडेच सिंगल स्क्रीन थिएटर असोसिएशनने सलमानला एक खुलं पत्र लिहून हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशी मागणी केली होती. सलमानचे चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये चांगलीच कमाई करत आले आहेत. करोना काळामध्ये लयास गेलेल्या थिएटर्स मालकांसाठी असे मोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित करणं म्हणजे थोड्या फार आशा पल्लवित होणं साहजिकच आहे.

हे देखील वाचा