टायगर श्रॉफ (Tiger Shroff) अभिनित ‘हिरोपंती २’ या शुक्रवारी म्हणजेच २९ एप्रिल रोजी रिलीझ झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या चाहत्यांना हा चित्रपट आवडला आहे, तर काहींना चित्रपटाच्या कथेत कोणतीही खास गोष्ट दिसत नाहीये. या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शनही काही खास राहिलेले नाही. अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे व्यवसाय करू शकणार नाही, असे मानले जात आहे. त्याच दरम्यान, या चित्रपटाबाबत आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.
चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो परिणाम
असे सांगितले जात आहे की, ‘हिरोपंती २’ अनेक वेबसाइटवर उपलब्ध आहे. म्हणजेच रिलीझ होताच हा चित्रपट लीक झाला आहे. चित्रपटाच्या ऑनलाइन लीकचा परिणाम त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होऊ शकतो. चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शनही खूप कमी आहे. आता हा चित्रपट लीक झाल्यानंतर त्याच्या कमाईचा आलेख आणखी घसरण्याची शक्यता आहे. (tiger shroff nawazuddin siddiqui starrer heropanti 2 leaked online)
‘रनवे ३४’शी आहे टक्कर
टायगरचा हा नवा चित्रपट सुपरस्टार अजय देवगणच्या (Ajay Devgan) ‘रनवे ३४’ला टक्कर देणार आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. अजय व्यतिरिक्त ‘रनवे ३४’मध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि बोमन इराणी (Boman Irani) देखील आहेत. अजय देवगणने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्याने ‘शिवाय’ आणि ‘यू, मी और हम’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा