Friday, April 19, 2024

‘ऍक्शन हिरो बनणं खूप वेदनादायक असतं…’, असं का म्हणतोय टायगर श्रॉफ?

टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या दमदार ऍक्शन सीक्वेन्स करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. अभिनेता खूप तंदुरुस्त आहे आणि तो फायटिंग सीक्वेन्स खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. गुरुवारी (२१ एप्रिल) रोजी त्याने त्याच्या आगामी ‘हिरोपंती २’ चित्रपटाच्या निर्मितीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसह शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टायगरने चित्रपटातील ऍक्शन सीनचे शूटिंग कसे केले, हे सांगितले आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

टायगर श्रॉफ अभिनित ‘हिरोपंती २’ चा ऍक्शन-पॅक ट्रेलर तुम्हाला चित्रपटाच्या बबलूला भेटण्यासाठी उत्सुक करेल. हा ट्रेलर पाहून प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की, टायगरने हे ऍक्शन सीन कसे केले असतील? टायगरने आता त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांसह एक व्हिडिओ शेअर करून या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ट्रेनमधून उडी मारण्यापासून ते सैनिकांशी लढण्यापर्यंत, टायगरने खूप मेहनत आणि विश्वासाने हे सर्व केले. (tiger shroff shares his film heropanti 2 behind the scene video)

हा व्हिडिओ शेअर करताना टायगरने लिहिले, “थोडे रक्त, खूप घाम, आणि मी खोटे बोलणार नाही, ऍक्शन हिरो बनणे खूप वाईट आहे! आमच्या चित्रपटाचे व्हिडिओ आणि काही न पाहिलेले फुटेज. चित्रपट लवकरच येत आहे मित्रांनो! फक्त ७ दिवसांनी.”

टायगर श्रॉफ व्यतिरिक्त ‘हिरोपंती २’ मध्ये तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawajuddin Siddiqui) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा ऍक्शन चित्रपट टायगरच्या २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ‘हिरोपंती’ याचा सिक्वेल आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा