आपल्या नशिबाने ‘बबलू’ भेटणार! टायगर श्रॉफच्या दमदार ऍक्शनने पुरेपूर ‘हिरोपंती २’चा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने फिल्मी दुनियेत खूप वेगाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो त्याच्या चित्रपटांमधील उत्कृष्ट डान्स आणि धमाकेदार ऍक्शनसाठी ओळखला जातो. इतकेच नाही, तर टायगर नेहमीच त्याच्या चाहत्यांना वर्कआउटसाठी प्रेरित करताना दिसतो आणि याच कारणासाठी तो सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर करतो. चाहते त्याच्या पर्सनालिटी तसेच त्याच्या अप्रतिम स्टंटचे कौतुक करताना थकत नाहीत. त्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. नुकताच टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट ‘हिरोपंती २’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकारांची ओळख अतिशय अप्रतिम पद्धतीने करण्यात आली आहे.

त्याचवेळी ट्रेलर प्रदर्शित करताना टायगरने (Tiger Shroff) कॅप्शनमध्ये लिहिले की, “बबलू शोधून नाही…नशिबाने भेटतो. तुझे नशीब चांगले आहे कारण मी तुला या ईदला भेटणार आहे.” हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

‘हीरोपंती २’ च्या (Heropanti 2 Trailer) ट्रेलरमध्ये जिथे टायगर श्रॉफ फुल ऍक्शनमध्ये दिसत आहे. तिथे नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) फुल स्वॅगमध्ये दिसत आहे. ट्रेलरमध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत टायगर श्रॉफला जबरदस्त स्पर्धा देताना दिसत आहे. जादूगाराच्या भूमिकेत नवाज इतका खतरनाक दिसत आहे की, त्याला पाहून तुम्ही नक्कीच अवाक व्हाल. चित्रपटात नवाजचे नाव लैला आणि टायगरचे नाव बबलू असून, तारा सुतारियाची (Tara Sutaria) स्टाईलही सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

चित्रपटात ताराच्या मनमोहक व्यक्तिरेखेचे ​​नाव इनाया आहे. जी एका सुंदर ऍक्शन-डोस ब्युटीसारखी दिसते. चित्रपटात बबलू आणि लैलाची झुंज प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी पुरेशी असून, ट्रेलरमध्ये पाहायला मिळणाऱ्या ऍक्शनवरूनच आपण अंदाज लावू शकतो की, सिनेमात किती वरच्या पातळीवरील कडक ऍक्शन दिसेल. चित्रपटात ऍक्शनसोबतच कॉमेडी, रोमान्स देखील पाहायला मिळणार आहे. नवाज आणि टायगर श्रॉफची डायलॉग डिलिव्हरी खूपच शानदार दिसते.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

साजिद नाडियादवाला यांच्या निर्मितीत तयार झालेला ‘हिरोपंती २’ चित्रपट कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक अहमद खान दिग्दर्शित करत आहे. ज्यांनी यापूर्वी ‘बागी २’ आणि ‘बागी ३’ मध्ये टायगर  सोबत काम केले आहे. संगीत ए आर रहमान यांनी दिले असून, तर चित्रपटाची कथा रजत अरोरा यांनी लिहिली आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी चित्रपटातील कलाकारांच्या अनेक पोस्ट शेअर करून सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढवले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post