Tuesday, December 23, 2025
Home बॉलीवूड ‘अरे कुणीतरी फायर ब्रिगेडला बोलवा’, टायगर श्रॉफच्या बहिणीच्या गुलाबी बिकिनीमधील फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

‘अरे कुणीतरी फायर ब्रिगेडला बोलवा’, टायगर श्रॉफच्या बहिणीच्या गुलाबी बिकिनीमधील फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

आपल्या अभिनय, फिटनेस आणि डान्सने चाहत्यांना वेड लावणारा बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने चांगले यश मिळवले आहे. त्याने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. असे असले, तरीही त्याची बहीण कृष्णा श्रॉफही चांगली प्रसिद्ध आहे. तिने अद्याप चित्रपटामध्ये पाऊल ठेवलेले नाही, परंतु ती आपल्या बोल्ड फोटोंमुळे बॉलिवूडच्या भल्या भल्या अभिनेत्रींनाही टक्कर देते. आपला भाऊ टायगर श्रॉफप्रमाणेच कृष्णाही फिटनेस फ्रीक आहे. ती नेहमी आपले ऍब्स फ्लॉन्ट करताना दिसते. नुकताच तिने एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिचे ऍब्स पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत.

कृष्णाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती गुलाबी बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. कृष्णाची फिट आणि हटके बॉडी पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूपच आवडत आहे आणि ते या फोटोवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत.

https://www.instagram.com/p/CL4FCbnJxqL/?utm_source=ig_web_copy_link

कृष्णाच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “अरे कुणीतरी फायर ब्रिगेडला बोलवा.”

https://www.instagram.com/p/CL1pLz8pBte/?utm_source=ig_web_copy_link

दुसऱ्या एका चाहत्याने, फायर इमोजी कमेंट केले आहेत. तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहे.

https://www.instagram.com/p/CLWnb_RJ2fA/?utm_source=ig_web_copy_link

विशेष म्हणजे चांगल्या कमेंटसोबतच काही युजर्स अपशब्दही या फोटोवर वापरताना दिसत आहेत.

कृष्णाची बोल्ड फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही कृष्णाने बिकिनीमधील फोटो शेअर केले होते. विशेष म्हणजे बोल्ड फोटोंव्यतिरिक्त तिने लेहंगा चोळी घालूनही आपले फोटो शेअर केले होते. यामध्येही तिचा बोल्ड अंदाज एकदम कडक दिसत होता.

https://www.instagram.com/p/BrkYAXUgDbq/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CKTU2sFM2kO/?utm_source=ig_web_copy_link

कृष्णाने आपल्या वाढदिवशीही बिकिनीमधील फोटो शेअर करत लिहिले होते की, २८ हे वय तिला शोभते. या फोटोमध्ये तिचा फोटो दिसत नव्हता, परंतु यामध्ये तिचा टॅट्यू स्पष्टपणे दिसत होता. या फोटोवरही चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेस ओव्हरलोड! तेलुगु अभिनेत्रीचे स्विमिंग पूलवरील बिकिनीतील फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा बोल्ड फोटो

-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!

हे देखील वाचा