Sunday, June 4, 2023

टिक टॉकवर 2 लाख फॉलोव्हर्स असणाऱ्या 21 वर्षीय मुलीचे निधन; काय होती शेवटची पोस्ट?

मागील काही वर्षांपासून प्रत्येक व्यक्तीमध्ये लपलेल्या कलाकाराला व्यासपीठ देण्यासाठी टिक टॉक या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. काही देशांमध्ये हे माध्यम बंद असले, तरीही मोठ मोठ्या देशांमध्ये या माध्यमाचा तुफान वापर केला जातो. टिक टॉकमुळे अनेक व्यक्ती स्टार बनले. अशात टिक टॉकवरीलच एका प्रसिद्ध मुलीबद्दल दु:खद बातमी समोर येत आहे. टिक टॉक स्टार अली डुलिनचे कार अपघातात निधन झाले आहे. ती अवघ्या 21 वर्षांची होती. अली लिप सिंक, मजेशीर आणि डान्स व्हिडिओ बनवायची. आता तिच्या निधनाने तिच्या चाहत्यांपासून ते मित्रांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या निधनाची बातमी तिच्या मित्राने इंस्टाग्रामवरून दिली आहे.

डुलिनच्या मैत्रिणीची पोस्ट
टिक टॉक स्टार अली डुलिन (Tik Tok Star Ali Dulin) हिच्या मित्राने एक भावूक पोस्ट शेअर करत लिहिले की, “मला विश्वास बसत नाहीये की, तू निघून गेली आहेस. मी तुला कधीच विसरणार नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पाडला आहेस. तू नेहमी माझीच राहशील. सर्वात चांगली मैत्रीण.”

अलीच्या निधनाच्या वृत्तावर तिची एक मैत्रीण एरियन अवंडी हिने लिहिले की, “हृदय तुटलं आहे. मला कसे वाटत आहे, हेदेखील सांगू शकत नाहीये. अली तू सर्वात वास्तविक आणि प्रेमळ व्यक्ती होतीस.”

अलीची शेवटची पोस्ट
अली डुलिन (Ali Dulin) हिने 5 डिसेंबर रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. त्यात ती काळ्या रंगाच्या टॉप आणि लाल रंगाच्या शॉर्ट्समध्ये पोझ देत होती. तिने पांढऱ्या रंगाचे हेडफोनही परिधान केले होते. तिने हे फोटो शेअर करत लिहिले होते की, “सुंदर बीच, सुंदर हृदय, सुंदर बुद्धी…”

कोण होती अली डुलिन?
अली डुलिन ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर होती. तिने हूटरमध्येही काम केले होते. टिक टॉकवर तिचे तब्बल 2 लाखांहून अधिक फॉलोव्हर्स होते. तसेच, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांशी संवाद साधायची. तिचे अधिकतर व्हिडिओ डान्स आणि तिच्या आयुष्याबद्दल असायचे. (tik tok star ali dulin passes away in car accident read about her)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘रणवीर तू सुपरस्टार आहेस’, गर्दीत अडकलेल्या मुलासोबत ‘असे’ केल्याबद्दल सर्वत्र होतंय अभिनेत्याचं कौतुक
काळ्या रंगावरून नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य; रिंकू राजगुरूचं नाव घेत म्हणाला, ‘गोरी नसूनही…’

हे देखील वाचा